चक्क ढाणकी तील १११ तरूण युवकांनी प्रवेश राष्ट्रीय काँग्रेस पक्षा मध्ये घेतला.
चक्क ढाणकी तील १११ तरूण युवकांनी प्रवेश राष्ट्रीय काँग्रेस पक्षा मध्ये घेतला
ढाणकी –
ढाणकी येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सर्व नेत्यांनी हार टाकून अभिवादन केले आपल्या प्रवेश सोहळा कार्यक्रमाची सुरुवात केली ,तसेच उपस्थित मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले काँग्रेस पक्षाकडून व असंख्य तरुणांनी भाजप विषई नाराजी व्यक्त करीत १११तरुणांनी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला. यांचे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्र समन्वयक तथा ढाणकी शहर अध्यक्ष अमोल जी तुपेकर याना.बाळू पाटील चंद्रे , गावातील काँग्रेस चे नेते व पक्षावर विश्वास ठेऊन तरुणांनी एकमताने ठराव करून भाजपवर नाराजी व्यक्त करीत. बाळासाहेब चंद्रे यांनी असे सांगितले क्राँग्रेस पक्ष हा सर्व ना सोबत घेऊन चालनार पक्ष आहे . ढाणकी परिसरात चर्चा ला उधाण आले आहे अचानक तरुणाई यांनी काँग्रेस पक्षा मध्ये का गेले? असा प्रश्न सर्व ना पडला. काँग्रेस मध्ये काँग्रेस १११युवकांनी पक्ष प्रवेश केल्या मुळे आनंदी वातावरण निर्माण झाले तर, भाजप मध्ये नाराजीचे चित्र दिसत आहे. काही दिग्गज नेते व तरुण युवक काँग्रेस मध्ये प्रवेश घेत असल्यामुळे भाजपा ढाणकीतील भाजप नेत्यांना यावर चिंतन करण्याची गरज आहे असे नागरिक बोलत आहे . तरुण पिढी काँग्रेस पक्षात गेलेल्या ने नक्कीच पक्षाला तरूणाई मुळे फायदा होईल .असे काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलण्यात येत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश केला गेला तरी सुध्दा याचा फायदा येनाऱ्या अगामी नगर पंचायत निवडणुकीतच दिसून पहावयास मिळेल. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तरावजी शिंदे तालुकाध्यक्ष उमरखेड, तातू भाऊ देशमुख, गोपाल शेठ अग्रवाल, ईश्वर गोस्वामी,गजानन भारती, रामभाऊ देवसरकर, मीनाक्षी सावळकर,सुनीता घोडे, बाळासाहेब चंद्रे पाटील, युवराज देवसरकर , ढाणकी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर,रामराव गारकवाड , शिवाजी ,वैद्य राहुल चंद्रे ,खाजाबाई कुरेशी, बाबुभाई वेल्डिंग वाले ,साहेबराव वाघमोडे,रुपेश भंडारी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.