बदलेल्या जीवनशैलीमुळे आजारात वाढ ! शरीराची काळजी घेण्याचे आवाहन -डॉ .अंकुश देवसरकर
बदलेल्या जीवनशैलीमुळे आजारात वाढ ! शरीराची काळजी घेण्याचे आवाहन -डॉ .अंकुश देवसरकर
प्रतिनिधी
उमरखेड : कामधेनु गोशाळा. व संस्कार सौरभ सार्वजानिक वाचणालय डॉ. असोसिएशन व केमीष्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोगनिदान शिबिरात भगवती मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल नांदेडचे संचालक डॉ अंकुश देवसरकर यांनी ढाणही येथे आयोजित रोगनिदान शिबिरात अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात आरोग्य सुवीधा नसल्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेची राहणीमान व जीवनशैली बदलल्यामुळे बॅडप्रेशर, हदयरोग, दमा, कॅन्सर, मलेरीया इत्यादी आजार सर्वसामान्य जनतेला होतात . नागरीकांनी शरीराची काळजी घ्यावी . तसेच अशा शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे .
आम्ही भगवती मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल तर्फे दर महीन्याला १५ त 20 रोगनिदान शिबिरे घेऊन गोरगरीब जनतेला महात्मा गांधी जनआरोग्य सुविधा व राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केल्यामुळ उमरखेड तालुक्यातील शेकडो रुग्णांना याचा फायदा देण्याचे कार्य करीत असतो . अशी माहीती अध्यक्षस्थानावरूण डॉ . देवसरकर यांनी दिली यावेळी डॉ . शुंभागी देवसरकर डॉ . योगेद्र चिन्नावार, डॉ . अनिल देवसरकर, डॉ अरुण बंग , डॉ कवाणे डॉ . जयराम बश्शी, डॉ सुरमवाड बालरोग , डॉ . तुष्णा नाईक, डॉ . बस्सी मॅडम डॉ . माने ,डॉ. एकलारे, डॉ . विठ्ठल फड , होते . प्रास्ताविक डॉ . लक्ष्मण रावते, आभार नामदेव गोपेवाड यानी मानले .