सी सी एम पी धारक बी एच एम एस डॉक्टरांना एम एम सी नोंदणीचा निर्णय मागे घ्या इंडियन मेडिकल असोसिएशन धडकले एसडीओ कार्यालयावर बेमुदत बंद आंदोलनाचे निवेदन
सी सी एम पी धारक बी एच एम एस डॉक्टरांना एम एम सी नोंदणीचा निर्णय मागे घ्या
इंडियन मेडिकल असोसिएशन धडकले एसडीओ कार्यालयावर
बेमुदत बंद आंदोलनाचे निवेदन
उमरखेड :
महाराष्ट्र शासनाने सी सी एम पी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बी एच एम एस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी देऊन आधुनिक वैद्यकीय पद्धतीने उपचार करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उमरखेड शाखेने तीव्र निषेध व्यक्त करत शहरातून मोर्चा काढत गुरुवारी दि. ६ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले आहे .
सकाळी १० वाजता शहरातील महात्मा गांधी चौकातून विविध मार्गाने मार्गक्रम करून निघालेल्या इंडियन डॉक्टर असोसिएशन चा मोर्चाने तीव्र आंदोलन करत शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
या मोर्चादरम्यान शहरातल्या सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आज दिनांक सहा पासून बेमुदत बंद करण्यात आल्याचे दर्शवण्यात आले .
आधुनिक वैद्यकशास्त्रातील एमबीबीएस शिक्षण हे अनेक वर्षांचे सखोल सैद्धांतिक व क्लिनिकल प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेवर आधारित असते. अशा परिस्थितीत केवळ अल्पकालीन सीसीएमपी अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकीय उपचार करण्याची परवानगी देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर व धोकादायक ठरू शकते.
या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून चुकीचे निदान व उपचारामुळे गंभीर आरोग्यविषयक परिणाम उद्भवू शकतात. तसेच वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाच्या गुणवत्तेच्या निकषांशी तडजोड होण्याबरोबरच विविध वैद्यकीय पद्धतींमधील पात्रतेच्या सीमारेषा धूसर होतील आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली आहे.
संघटना कोणत्याही वैद्यकीय पद्धतीच्या विरोधात नसून प्रत्येक वैद्यकीय शाखेचा आदर करते. मात्र संबंधित पदवी, प्रशिक्षण आणि कायदेशीर पात्रतेनुसारच वैद्यकीय व्यवसाय करण्याची व्यवस्था कायम राहावी, हीच संघटनेची भूमिका आहे.
महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या निर्णयानुसार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या बाह्यरुग्ण , आंतररुग्ण तसेच इतर नियमित वैद्यकीय सेवा बेमुदत बंद आंदोलनाच्या स्वरूपात ठेवण्यात आल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.
शासनाने रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सी सी एम पी च्या आधारे आधुनिक वैद्यकीय उपचारांना परवानगी देण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन उमरखेड शाखेने केली आहे.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ. सारिका देशमुख व सचिव डॉ. विवेक पत्रे डॉ मंगेश नरवाडे ,डॉ या मा राऊत ,डॉ गजानन , डॉ संदेश देशमुख, डॉ सोनाली बंग ,डॉ प्रीती जयस्वाल, डॉ श्रीकांत जयस्वाल ,डॉ कुणाल काळे ,डॉ किशोर राठोड, डॉ राम नाईक, डॉ प्रफुल भानेगावकर , डॉ अर्चना रावते ,डॉ जयराम बसी ,डॉ सारिका वानखेडे ,डॉ नोहेद गौस , डॉ अरुण बंग ,डॉ सुनील बंग , डॉ कृष्णा नाईक , डॉ नागेश माने यासह अनेक इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सदर आंदोलनात उपस्थित होते .


I just installed the app and the login process is super smooth. Really impressed with how fast it loads. Check it out at plus777apploginapk
I doo nnot even uderstand how I finishe uup right here,
howeverr I thought thhis submjit waas great. I don’t know whoo you
arre however certaunly you’re goiing too a well-known bllogger wjen yoou
aare not already. Cheers! xnxx
The graphics and sounds make the whole experience so immersive. It feels like a real casino right in my room. Love richjili777!
[4384]12bd লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | সেরা লাইভ ক্যাসিনো সাইট,12bd লগইন করে সেরা লাইভ ক্যাসিনো গেম উপভোগ করুন। বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট এবং 12bd app ডাউনলোড করে আজই স্লট গেম খেলা শুরু করুন। visit: 12bd