पळशी येथील कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करा संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड
पळशी येथील कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करा
संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड
उमरखेड –
उमरखेड तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवकांनी केलेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ,उपविभागीय अधिकारी उमरखेड. गटविकास अधिकारी पं. स. उमरखेड यांना संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांचे वतीने आज दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन देण्यात आले.
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत मौजा – पळशी येथे ग्रामसेवक म्हणुन आढागळे हे जेव्हा रुजू झाले तेव्हापासुन त्यांनी तिथे केलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. प्रत्येक कामाचे टेंडर पारदर्शकपणे न लावता टेंडर मॅनेज करुन स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराच्या नावाने टेंडर देण्यात येऊन सर्व कामे निकृष्ट दर्जाची केलेली आहेत.
संबंधीत ग्रामसेवक हे गावकरी व इतर कुणीही त्यांना नियमानुसार माहिती मागितल्यास त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याने माहिती पुरवित नाहीत. तेव्हा विनंती की, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची आपल्या स्तरावर चौकशी करण्यात यावी. तसेच गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यापुर्वी तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी व त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीर्व आंदोलन छेडण्यात येईल असा संयुक्त पत्रकार संघ इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी संस्था पत्रकार संघातील समस्त पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this
Pink Withney very informative articles or reviews at this time.
Thank you for the good writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how could we communicate
Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supply
Telif hakkı savunması Google SEO ile web sitemizin trafiği gözle görülür şekilde arttı. https://www.royalelektrik.com/catalmese-elektrikci/