12 वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा गावकऱ्यांचा आरोप
12 वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू
आत्महत्या नसून खून असल्याचा गावकऱ्यांचा आरोप
उमरखेड :
तालुक्यातील पिरंजी या गावात एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली असून या आत्महत्येमुळे मात्र अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे . त्या मुलाने आत्महत्या केली नसून ती हत्या केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्याने काही काळ उमरखेड पोलीस स्टेशनला गोंधळ उडाला होता .दरम्यान त्या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवराव विठ्ठल भुसाळे वय 12 वर्ष या बालकांनी आपल्या राहत्या घरासमोरील गुरांच्या गोठ्यात रात्री 8 वाजताच्या दरम्यान फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते मात्र एवढ्या लहान मुलाने आत्महत्या केली त्यावर गावकऱ्यांनी संशय व्यक्त करीत पोलिसांना पाचारण केले . रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह हे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात आणले दरम्यान आज दुपारी त्या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले. असून शवविच्छेदनानंतर मृत्यूदेह हा गावात पाठवल्याच्या अगोदरच गावकऱ्यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे जमाव करीत या बाळाने आत्महत्या केली. नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात जमाव केला त्यावेळी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड व सहाय्यक पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी भेट देऊन मृतक बालकाच्या आईला बयानासाठी उमरखेड पोलीस स्टेशनला बोलविले . आईच्या बयानावरून आईला घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अंत्यसंस्कार करण्यासाठी पिरंजी या गावात दाखल झाले . बाळावर अंत्यसंस्कार आज सायंकाळी पाच वाजता दरम्यान करण्यात आले. असून अद्यापही त्या बालकांनी आत्महत्या केली की त्याचा खून झाला असावा हा संशय असून बालकाच्या शवविच्छेदना नंतरच्या अहवाला नंतरच हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी सांगितले . या घटनेने मात्र लहानसे पिरंजी गाव हादरले आहे . अनेक तर वितर्क या गावातील नागरिक लावत आहेत . या अगोदर अशाच प्रकारची घटना तालुक्यातील दिघडी येथे दोन दिवसा अगोदर घडली होती . नेमके उमरखेड तालुक्यात लहान बाळांच्या विषयातच असे प्रकार घडत असल्याने याबाबतही कुठेतरी उपाययोजना करण्याची गरज आहे .पुढील तपास डीवायएसपी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेडचे ठाणेदार संजय सोळंके व पोलीस कर्मचारी करीत आहेत .
वृत्त लिहीपर्यंत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .
सोबत फोटो :
मृत बालक देवराव