.जलद गती न्यायालयात केस वर्ग करून बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या* – *जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन*
जलद गती न्यायालयात केस वर्ग करून बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या
– जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन
उमरखेड
अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची केस जलदगती न्यायालयात चालुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्याची जामीन किंवा पॅरोलवर सुटका करू नये अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यातील पळशी येथुन शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीला पळशी बसस्थानकावरुन एका नराधामाने भावनिक बतावनी करुन दुचाकीवर बसवून तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करुन तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे त्यासाठी शासनाने अॅड. उज्वल निकम यांना जलद गती न्यायालयात नियुक्त करुन पिडीत मुलीला न्याय द्यावा.आरोपी हा सराईत गुन्हेगार असून या अगोदर अनेक खुनाचे गंभीर गुन्हे त्याचेवर दाखल असल्यामुळे आरोपीला जामिन देवु नये किंवा त्याची पॅरोलवर सुटका होवू नये यासाठी सरकारने अति दक्षता घ्यावी अशी परिसरातील जनतेची मागणी असुन आरोपी पॅरोलवर असतांना त्यांने अनेकवेळा असे कृत्य केल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्याला कारागृहातच ठेवून प्रकरणाचा निकाल देण्यात यावा त्याच प्रमाणे पिडीत मुलीला अतिविशेष बाब म्हणून नवोदय विद्यालयात प्रवेश देवून तिच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी व तिला भयमुक्त शिक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्फत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जगदीश नरवाडे संजय बिजोरे ,अरविंद धबाडगे अरविंद कोळसकर ,किरण मुक्कावार ,सविता पाचकोरे सह नागरिक उपस्थित होते