जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक संपन्न मुदतबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावा- आ.किसनराव वानखेडे

youtube

जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक संपन्न
मुदतबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावा- आ.किसनराव वानखेडे

उमरखेड -/

जनसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न हेरून उमरखेड -महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली दि.14 डिसेंबर रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, भाजपा यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये उपविभागीय अभियंता सौरभ सोनी यांनी महागाव, उमरखेड तालुक्यातील कामांचा आढावा सादर केला. आमदार किसनराव वानखेडे यांनी कामाची मुदत संपून देखील काम पूर्ण न करणाऱ्या, मुदतबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदाराना तात्काळ दंड आकारणी करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. पाईपलाईन करतांना गावांतर्गत रस्त्यांच्या खोदकामांमुळे नागरीकांना होणारा त्रास तात्काळ थांबला पाहिजे. त्याअनुषंगाने संबंधित कंत्राटदारास खोदलेले रस्ते बुजविण्याची तंबी देण्याचे निर्देश देखील आमदार वानखेडे यांनी प्रशासनास दिले. तसेच निधीअभावी रखडलेल्या 180 कामांवर अधिवेशनापश्चात वाढीवनिधीची मागणी करणार, मुदतबाह्य अंदाजपत्रकांची मुदत वाढविण्यासाठी शासनास पत्रव्यवहार करणार, बंदीभागातील खरबी, सेवालाल नगर,वालतुरसह इतरही गावातील विहीर निर्मितीसाठी आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणसंबंधाने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणार असून उमरखेड, महागाव तालुक्यातील प्रत्येक घरात नळजोडणी झाली पाहिजे असा दम यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भरला. उमरखेड-महागाव तालुक्यामध्ये एकूण मंजूर कामे किती..?,पूर्ण झालेली कामे किती?, उमरखेड-महागाव तालुक्यामध्ये सद्यस्थितीत सुरू असलेली कामे किती..?, एकूण पेंडिंग/ रखडलेली कामे किती?, किती कामांची बिले निघाली व किती कामांची बिले पेंडिंग आहेत..?, बिला अभावी पेंडिंग असलेली कामे कोणकोणती आहेत..? याबाबत सखोल माहिती आमदार किसनराव वानखेडे यांनी जाणून घेतली.
जलजीवन मिशन हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने यावर विशेष लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना देखील आमदार किसनराव वानखेडे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.
जलजीवन मिशनच्या कामांबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उदासीन न राहता सजग राहून काम करून घेणे गरजेचे असल्याची अपेक्षा वानखेडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी नितीन भुतडा यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत विचारणा केली हे विशेष..
जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणीसाठी कंत्राटदारांनी नागरिकांकडून पैसे घेऊ नये असे निदर्शनास आल्यास ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देखील आमदार किसनराव वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना दिल्या.सदर बैठकीस ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे महागाव व उमरखेड उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.

मुळावा गावातील नळजोडणीसाठी प्रत्येक नळ धारकांकडून तीनशे रुपये अनामत रक्कम स्वरूपात घेण्यात येत असल्याची तक्रार संतोष देवसिंग आडे यांनी आमदार वानखेडे यांचेकडे केली होती.त्याअनुषंगाने गटविकास अधिकारी यांना नोटीस देऊन विचारणा करण्याच्या सूचना आमदार वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक संपन्न मुदतबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावा- आ.किसनराव वानखेडे

  1. Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

  2. Hi Neat post There is a problem along with your website in internet explorer would test this IE still is the market chief and a good section of other folks will pass over your magnificent writing due to this problem

  3. Noodlemagazine You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!