आरोप निराधार; सर्व निर्णय पारदर्शक” — भाऊसाहेब माने जीनिंग संस्थेची पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका उमरखेड :- सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जीनिंग अँड प्रेसिंग संस्था, उमरखेड
आरोप निराधार; सर्व निर्णय पारदर्शक” — भाऊसाहेब माने जीनिंग संस्थेची पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका
उमरखेड :- सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जीनिंग अँड प्रेसिंग संस्था, उमरखेड विरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी व आरोपांबाबत संस्थेने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर वस्तुस्थिती स्पष्ट केली. सर्व निर्णय संचालक मंडळाच्या ठरावानुसार, कायदेशीर व पारदर्शक पद्धतीनेच घेतल्याचा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
१४ गाळ्यांचे बांधकाम कंत्राट पद्धतीने; दरात १३.८०% कपात
संस्थेकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने १४ दुकान गाळ्यांचे बांधकाम थेट संस्थास्तरावर न करता कंत्राट पद्धतीने देण्याचा ठराव २० डिसेंबर २०२५ रोजी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानुसार वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा मागविण्यात आल्या. अधिकृत अभियंत्यांच्या अंदाजपत्रकानुसार दर रु. १९१६.०३ प्रति चौ.फुट असताना, प्राप्त निविदांपैकी सर्वात कमी दर सुमारे १३.८० टक्के कमी होता. पुढे वाटाघाटी करून दरात आणखी रु. २५ प्रति चौ.फुट कपात करण्यात आली.
रु. ८७५ प्रति चौ.फुट दराने कोणतीही निविदा आलेली नसताना संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरण कायदेशीर
कर्मचारी ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरणाबाबत सर्व देयके संचालक मंडळाच्या ठरावानुसार आणि Payment of Gratuity Act, 1972 प्रमाणे अदा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. वर्षाला १५ दिवसांच्या पगाराच्या प्रमाणात ग्रॅच्युइटी व कमाल ३०० दिवसांच्या मर्यादेत रजा रोखीकरण करण्यात आले असून संस्था नफ्यात असल्याचा दावा करण्यात आला.
CCI दर १४५० रुपये नसल्याने प्रक्रिया थांबवली
कापूस प्रक्रिया बंद केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना, चालू हंगामात प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी जाहिरात व चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सभेवर काही तक्रारकर्त्यांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्ती न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही.
नंतर Cotton Corporation of India (CCI) ने डिपॉझिटची मुदत वाढविल्यानंतर संस्थेने ठराव करून डिपॉझिट भरले. मात्र जीनिंग युनिटमध्ये आवश्यक सुधारणा व खर्चाचा अभ्यास केल्यानंतर प्रति गठाण किमान रु. १४५० दर मिळाल्यासच व्यवहार परवडणारा ठरेल, असा निष्कर्ष निघाला. CCI ने रु. १४०० पेक्षा कमी दर ठरवल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया न सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेत मान्यवरांची उपस्थिती
पत्रकार परिषदेला आमदार किसन वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, डॉ. विजय माने, माजी आमदार विजय खडसे, नितीन माहेश्वरी, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी माने, उपाध्यक्ष अॅड. जितेंद्र पवार, सुदर्शन रावते, अवधुत देवसरकर, श्रीराम पाटील, ऍड अनिल माने, बळवंत नाईक, संदीप हिंगमिरे, अरविंद भोयर तसेच संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट : “विकासात राजकारण अडथळा; रेशीम क्लस्टरचा पर्याय”
सतत अडथळे, अनावश्यक विरोध व निर्णय प्रक्रियेत अडवा-आडवीमुळे सहकारी तत्त्वावर रेशीम रेलिंग उद्योग उभा करणे अवघड होत असल्याचे मत सत्यशोधक शेतकरी संघ चे डॉ. विजय माने यांनी व्यक्त केले. आवश्यक असल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम क्लस्टर स्थापन करून प्रकल्प पुढे नेण्याचा पर्यायही त्यांनी सुचविला.
संस्था सहकार तत्त्वांनुसार पारदर्शक व जबाबदार कारभार करण्यास कटिबद्ध असून सभासदांनी अधिकृत नोंदींवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.




**prostafense**
ProstAfense is a premium, doctor-crafted supplement formulated to maintain optimal prostate function, enhance urinary performance, and support overall male wellness.
**aqua sculpt**
AquaSculpt is a high-quality metabolic support supplement created to help the body utilize fat more efficiently while maintaining steady, reliable energy levels throughout the day.
**boostaro**
Boostaro is a purpose-built wellness formula created for men who want to strengthen vitality, confidence, and everyday performance.
Tại 188V – myhotelnewyork.com , mỗi khách hàng đều là một thượng khách. Chúng tôi cam kết mang lại dịch vụ hỗ trợ 24/7, đảm bảo mọi hành trình trải nghiệm của bạn luôn thông suốt. TONY03-11O
**neurosharp**
Neuro Sharp is a modern brain-support supplement created to help you think clearly, stay focused, and feel mentally confident throughout the day.
**prodentim**
ProDentim is a distinctive oral-care formula that pairs targeted probiotics with plant-based ingredients to encourage strong teeth, comfortable gums, and reliably fresh breath.