सर्वाधिक मताधिक्य घेत चितांगराव कदम सर विजयी उमरखेड.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230620-WA0728-1024x578.jpg)
सर्वाधिक मताधिक्य घेत चितांगराव कदम सर विजयी
उमरखेड
उमरखेड तालुका जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी ची संचालक पदाची निवडणूक तालुक्यात चांगलीच गाजली.१८ जून रोजी मतदान पार पडल्यानंतर १९ जून रोजी झालेल्या मतमोजणीचा निकाल रात्री दीड वाजता जाहीर झाला.
अतिशय अटीतटीच्या लढतीत सत्यशोधक शेतकरी संघचे नऊ उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आले आहेत.उमरखेड
नगरपरिषद हॉलमध्ये सकाळी दहा वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली होती. मतमोजणीच्या सुरवातीला पहिल्या फेरीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती.तेंव्हा महाविकास आघाडी एकहाती सत्ता स्थापन करणार असा कयास लावला जात होता. पण दुसऱ्या फेरीमध्ये विमानाने टेकअप केले आणि विजय होउनच जमिनीवर उतरले. डाॅ.विजय माने, ऍड.अनिल माने,नितीन माहेश्वरी,डॉ.विना कदम, मा.आ.प्रकाश पाटील देवसरकर मा.आ.विजय खडसे ,भा.जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी संघाचे नऊ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे सात उमेदवार विजयी झाले.विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामांना मतदारांनी चांगली पसंती दिली. ते सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.त्यानंतर सत्यशोधक शेतकरी पॅनलचे जितेद्र पवार,कपिल चव्हाण,श्रीराम कदम,शिवाजीराव माने,अवधूत देवसरकर,रेणुका माने, चंद्रजित देवसरकर,उध्दव गायकवाड हे संचालक निवडुण आले. तर महाविकास आघाडी पॅनलचे अतुल पाटील,विजया मुटकुळे, सतिश नाईक,अरविंद भोयर, डॉ संजय माने ,डॉ देवसरकर, संजय कदम हे उमेदवार विजयी झाले.