शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडाची पवित्र माती मंगल कलश दर्शन रथयात्रेचे आयोजन.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडाची पवित्र माती मंगल कलश दर्शन रथयात्रेचे आयोजन
शिवराज्याभिषेक सोहळा समितीची पत्रपरिषदेत माहिती
उमरखेड : –
भारताची ललाटरेषा बदलणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 2 जून 2023 रोजी 350 वर्षे होत असून त्यानिमित्ताने छ . शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पद स्पर्शाने पुनित झालेल्या रायगडावरील पवित्र माती भरून आणलेल्या मंगल कलशाचे दि . 2 जून रोजी तालुक्यातील मुळावा येथील रेणुकामाता संस्थान येथे आगमन होऊन मंगल कलशातील मातीने या परिसरात प्रथमतः वृक्ष लागवड करून उमरखेड – ढाणकी – महागाव परिसरातील गावांमध्ये कलश दर्शन रथयात्रा पोहचणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती व्दारा स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे .
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त राष्ट्र जागरण व जन चेतना जागृती अभियान स्वरूप समाज सहभागातून कार्य व्हावे यासाठी छत्रपती शिवरायांच्या व मावळ्यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या दुर्गराज रायगडावरील पवित्र माती भरून आणलेल्या मंगल कलशाचे दि . 2 जून रोजी सकाळी 10 वाजता मुळावा येथील रेणुकादेवी संस्थान येथे आगमन होणार असून सोबत आणलेल्या मातीने परिसरात वृक्ष लागवड करून उमरखेड – ढाणकी – महागाव परिसरातील तरोडा पोफाळी तर 3 जून रोजी पोफाळी बेलखेड, मार्लेगाव दि . 4 जून रोजी विडूळ साखरा चातारी ब्राम्हणगाव दि . 5 जून रोजी ढाणकी बिटरगाव जेवली मोरचंडी दि . 6 जून रोजी दराटी चिखली नारळी निंगनूर दि. 7 जून रोजी फुलसावंगी काळी टेंभी महागाव दि 8 जून रोजी पोहंडूळ हिवरा आंबोडा दि . 9 जून रोजी सवना गुंज मोरथ मुडाणा दि . 10 जून रोजी बिजोर सुकळी (ज ) असा पवित्र रथयात्रेचा प्रवास होणार असल्याची माहिती उमरखेड शिवराज्यभिषेक समितीचे गजानन शिंदे , अॅड. विलासराव देवसरकर, अजय बेदरकर, प्रविण फुलारी, चंदू पाटील वानखेडे प्रशांत जाधव देवहरी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली .