ढाणकी व बंदीभागात साहेबराव कांबळे बेलखेडकर नावाची चर्चा गाजत आहे.

youtube

ढाणकी व बंदीभागात साहेबराव कांबळे बेलखेडकर नावाची चर्चा गाजत आहे

उमरखेड –

महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लागण्याकरिता एक वर्षाचा अवधी बाकी असतानाच, उमरखेड-महागाव विधानसभेत सर्वच पक्षाकडून अनेक नवोदित उमेदवारांनी आपली कंबर कसलेली सध्या बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या, सामाजिक कामे करत असलेल्या पोस्टने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. समाजात, सामान्य जनतेच्या मध्ये जाऊन जो तो आपापल्या पद्धतीने समाजसेवा करतानाचे फोटो व पोस्ट प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल करत असतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
यावरून प्रश्न असा पडतो सामाजिक कामे करताना, ह्या पोस्टचा निवडणूक जवळ आल्यावरच पाऊस का पडावा? अशी चर्चा सामान्य नागरिक करताना दिसत आहेत.
परंतु यास अपवाद, निस्वार्थ भावनेने सामाजिक दायित्व जपणारा, युवा, अभ्यासु, प्रशासकीय अनुभवाची शिदोरी बरोबर असलेला, फ्रेश चेहरा म्हणुन, ढाणकी व बंदीभागात सध्या तरी एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ता साहेबराव कांबळे बेलखेडकर. ज्यांचं बालपण सामान्य गरीब कुटुंब, ज्यांच शिक्षण बेलखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं, परिस्थितीची जाण असलेला सुज्ञ नागरिक, परिस्थितीशी लढा देऊन अभ्यास करून मोठा अधिकारी झालेले. अधिकारी झाल्यानंतर समाजसेवा, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून मिळालेल्या नोकरीचा राजीनामा देऊन, आपल्या लोकांची, आपल्या तालुक्यातील लोकांची सेवा करता यावी हा स्वच्छ उद्देश नजरेसमोर ठेवून, त्यांनी नौकरीला सोडचिठ्ठी देत, उमरखेड महागाव विधानसभेकडे मार्गक्रमण केले.
साहेबराव कांबळे यांच्या सामाजिक कार्याची चर्चा भरपूर प्रमाणात होत असल्याकारणाने, आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, प्रामुख्याने उमरखेड महागाव मतदार संघात, प्रत्येक गावखेड्यात छोटे छोटे उद्योग उभारले गेले पाहिजे. छोटे छोटे उद्योग उभारले तर भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. आणि बेरोजगार हातांना काम मिळेल. जेणेकरून गोरगरीब नागरिक स्वयं सिद्ध होतील. तेंदू पत्ता हा बंदी भागातील सर्वच गाव खेड्यांना विकण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. तसेच या रोजगारासाठी त्यांना दळणवळण व्यवस्था सोयीस्कर व्हावी याकरिता, चांगल्या रस्त्याची निर्मिती हे सुद्धा एक ध्येय असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. मुरली येथील अकरा वर्षांपासून रखडलेला रस्ता माझ्याच पाठपुराव्याने यावेळेस मंजूर झाला असल्याचे सुद्धा त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
प्रशासनिक अनुभव असलेला, उच्चशिक्षित व प्रतिकूल परिस्थितीची जाण असलेला उमेदवार, यावेळेस उमरखेड महागाव विधानसभेला मिळावा आणि उमरखेड महागाव विधानसभेचे नशीब चमकावे हे सामान्य नागरिक मतदार राजाच्या हातात असल्याकारणाने, सुज्ञ मतदार यावेळेस नक्कीच साहेबराव कांबळे यांच्यासारख्या निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतील, अशी चर्चा सध्या ढाणकी व बंदी भागात नागरिक करताना दिसत आहेत.
तसेच ढाणकी व बंदीभागातील जनता यावेळेस संधीसाधू समाजसेवकापेक्षा, खऱ्या समाजसेवकाला प्राधान्य देणार असल्याची सुद्धा चर्चा प्रचंड प्रमाणात रंगली आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकी व बंदीभागात साहेबराव कांबळे बेलखेडकर नावाची चर्चा गाजत आहे.

  1. また自毛植毛に関しては、移植した髪の毛は一度抜け落ちてから新しく伸び始めるため、ある程度毛髪が成長するまでに1年ほどかかるというデメリットもあります。 【初回限定プラン】ジェネリック医薬品 フィナステリド錠 SKI 1ミリグラム (30錠)【男性用】 専用の駐車場はありませんが、22mほどの距離にタイムズ南幸第3という有料駐車場があるため車で通うこともできます。 日置クリニックは泌尿器科と皮膚科の診療科目があり、専門的な医療をわかりやすく提供しているクリニックです。患者の不安や疑問を解消するためにフランクな雰囲気づくりや看護スタッフのアットホームな対応を心がけており、一人ひとりに寄り添う医療を施しています。AGA治療では内服薬のプロペシアやザガーロ、ジェネリックのフィナステリドを処方しています。休診日は土曜午後・木曜・日曜・祝日。土曜日は12時まで診療しています。18台分の駐車場を完備しています。
    https://photozou.jp/user/top/3347463
    トラネキサム酸は、即効性は期待できず、じんわりと効果が出てくるため、「効果がよくわからない」と途中でやめてしまう方も多くいます。効果や治療期間などの正しい説明が重要です。 エラーのため失敗しました。 しばらくおいて再度お試しください。 そもそも PDE5 は、海綿体に多く存在する酵素で、平滑筋を弛緩させる情報伝達に関わる勃起に必要不可欠な物質「サイクリック GMP」を分解する働きをします。この PDE5 が活発になりすぎると勃起機能が衰えるため、PDE5 阻害薬によりこの酵素を抑制し、海綿体内のサイクリック GMP 濃度を上昇させることで平滑筋が弛緩して血行が良くなり、勃起を促します。これにより、勃起のメカニズムを正常化させるのです。

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!