अनाथ विजयाचे साईप्रसाद परिवाराच्या मदतीने सावळेश्वर येथे कन्यादान संपन्न.
अनाथ विजयाचे साईप्रसाद परीवाराच्या मदतीने सावळेश्वर येथे कन्यादान संपन्न
उमरखेड –
नांदेडच्या साईप्रसाद परीवाराने सरसम ता. हिमायतनगर जि. नांदेड येथिल अनाथ विजयाच्या विवाहाची जबाबदारी घेत दि. १५ शुक्रवारी सावळेश्वर ता. उमरखेड येथे संपन्न झालेल्या विवाहासाठी कुठलाही गाजावाजा न करता संसारउपयोगी भांडे, लग्न विधीचे सर्व साहित्य लग्नाच्या दहा दिवस अगोदर विजयाच्या घरी पोहचवुन सामाजीक जबाबदारी पार पाडली आहे. साईप्रसादने केलेल्या मदतीमुळे विजयाचे कन्यादान वर मंडपी थाटामाटात पार पडले आहे.
सरसम ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील अनाथ विजया विठ्ठल शिंदे हिचे वडील लहान पणीच वारले, त्यानंतर आजी-आजोबा काकांनी सांभाळ केला, कालांतराने आजोबा वारले, घरची सर्व जबाबदारी आजी काकांवर पडली, परीवारात केवळ ५२ आर जमीन आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा मातीच्या कच्च्या घरात ते दिवस काढतात, दरम्यान नात्यातील गजानन हुसेकर रा. सावळेश्वर ता. उमरखेड यांचेशी विनाअट विजयाचा विवाह जुळवुन आला . एक मुलगी आपल्या विवाहात काही तरी साहित्य असावे असे स्वप्न बघते. पण काकांची परस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे लग्नाच्या खर्चासाठी उवाजुळव होवू शकत नव्हती. विजयाच्या खडतर प्रवासाची माहिती समन्वयक, दात्यांकडुन नांदेड येथील साईप्रसाद परीवाराला मिळाली.
साईप्रसाद परीवाराकडे कोणी मदतीशिवाय रिकाम्या हाताने परत गेला नसल्याने नेहमी प्रमाणे कोणताही गाजावाजा न करता नांदेडसह देश विदेशातील दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने गेल्या तीन महिन्यापासून सुरू केलेल्या बळीराजा चेतना अभियानां अंतर्गत स्वयंसेवक व समन्वयक यांच्या मदतीने दि.५ एप्रिल रोजी सरसम येथे विवाहाच्या दहा दिवस अगोदर गादी, पलंग, राजाराणी अलमारी, सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीचे जोडवे, मिक्सर, ताट, तांब्या असे संसार उपयोगी भांडे व विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य घरपोच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघुन विजयासह काका परीवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
गरीब अनाथ मुलीच्या विवाहासाठी साईप्रसाद परीवाराने बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत कन्यादानाची जबाबदारी पार पाडली, परीवारातील सदस्य, समन्वयक, यांनी केलेल्या मदतीचे ग्रामस्थ, आप्तस्वकीयातुन कौतुक होत आहे.
या विवाहासाठी माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख, पाटिल चित्रपटाचे नायक नरेंद्र देशमुख, उध्दवराव रामतिर्थकर, खासदार हेमंत पाटिल यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार साहेबराव गाडे, मारोती सुर्यवंशी, बालाजी मंडलवाड, सुनिल दमकोंडवार, सरपंच ओम रावते, पोलिस पाटिल अनिल पाटिल, त.मु. अध्यक्ष शंकरराव रावते, सेवानिवृत्त लिपीक मधुकर रावते, दिनेश रावते, अवधुतराव सादलवाड, महेश रावते, नारायण पसलवाड, नामदेव भेद्रे, दत्तात्र्य हुसेकर, बाळु हुसेकर यांचेसह नातेवाईक ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
#### चौकट ####
साईप्रसाद परीवाराने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत बळीराजा चेतना अभियान सुरू केल असुन अडचनीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीचे कन्यादान, मुलांचे शिक्षण, मदतीचे विविध उपक्रम सतत राबवत असतात, दहा हजार व्यक्तींचा समुह असलेल्या दानशुर व्यक्ती नांदेडसह देश विदेशात वास्तव्यास आहेत, एका विचाराच्या व्यक्ती एकत्र आल्याने त्यांच्या दातृत्वातुन सर्व काही शक्य आहे, साईप्रसाद परीवारा कडुन नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दररोज अन्न छत्र चालवले जाते, हे सर्व करीत असतांना कुणाचही नाव समोर येत नाही हे विशेष आहे.
You have observed very interesting points!
ps nice internet site.Blog monry