सरसगट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाण पत्र देण्यात यावे – पत्रकार परिषदेत मराठी क्रांती मोर्च्याची मागणी.

youtube

सरसगट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाण पत्र देण्यात यावे – पत्रकार परिषदेत मराठी क्रांती मोर्च्याची मागणी

 

उमरखेड : शहरात ५ सप्टेंबर पासून चालू असलेल्या  मराठा समाजाच्या आमरण उपोषणाची  दखल शासनाने त्वरीत घेऊन महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाण पत्र देण्यात यावे . अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी , उमरखेड येथे चालू असलेल्या आमरण उपोषण मंडपात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. १ सप्टेबर २३ रोजी महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसुत्रता येण्यासाठी व अभ्यास करून अहवाल देण्यासाठी समीती गठीत केली त्या समीतीकडे संपूर्ण विदर्भाचा समावेश करण्यासाठी शिफारस करावी . तसेच भारताच्या संसदेत आरक्षण मर्यादा वाढविण्याचे विधेयक मंजुर करून आरक्षण मर्यादा वाढवावी व सरसगट मराठा समाजाचा इतर मागास वर्गात समावेश करावा . तसेच आंतरावली सराटी येथे संविधानिक व शांततापुर्ण सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान १ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडून बळाचा वापर करून अमानुषपणे आंदोलकांवर लाठी हल्ला करण्यात आला . त्या मध्ये अनेक नागरिक जखमी झाले . या घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी . आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत . जाती – जातीत तेढ निर्माण होईल असे कुठलेही राजकारण सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या आडून करू नये . असे पत्रकार परिषदेत सांगीतले . तसेच शासनाने सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय घ्यावा . त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात येईल .  सचिन घाडगे  , गोपाल कलाने शिवाजी पवार सुदर्शन ऊर्फ गजानन जाधव शरद मगर यांच्या उपोषणाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!