कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चे शालेय विद्यार्थ्यांना तेजमल गांधी विदयालयात प्रशिक्षण  व कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न तेजमल गांधी कृषी विद्यालय डॉट कॉम या वेबसाईट चे सुद्धा उद्घाटन

youtube

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चे शालेय विद्यार्थ्यांना तेजमल गांधी विदयालयात प्रशिक्षण  व कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

तेजमल गांधी कृषी विद्यालय डॉट कॉम या वेबसाईट चे सुद्धा उद्घाटन

प्रतिनिधी
उमरखेड

. कृत्रिम बुद्धिमता अंतर्गत संगणक कोडिंग, रोबोटिक इंजिनियरिंग, 3D प्रिंटिंग मध्ये शालेय विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञान अवगत करण्या संदर्भात दिनांक ५ जुलै रोजी या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन अँड निलय नाईक माजी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव वानखेडे आमदार उमरखेड होते तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, तेजमल गांधी कृषी विद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने, अँन्ड अर्चनाताई माने, विठ्ठलराव काळे,काशिनाथ पाटील कदम,अनुपजी यादव, परमानंद गरुडे सरपंच, परमानंद कदम, रत्नाकर मुक्कावार, माधवराव कोथळकर,धनंजय माने सरपंच, सुनील देवसरकर पोलीस पाटील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या युगामध्ये आजचा विद्यार्थी भविष्यात यशस्वी होण्यासाठी या पूर्वीच या विद्यालयात कृत्रिम बुद्धिमता अंतर्गत संगणक कोडिंग रोबोटिक्स तंत्रज्ञान, 3D प्रिंटिंग व इतर उपयोगी तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्याच्या अनुषंगाने कोणतेही शासकीय अनुदान न घेता STEM Lab निर्माण करण्यात आलेली होती, या तंत्रज्ञानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी मनुष्यबळाचे वेगळ स्रोत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे या साठी प्रथम ३० प्रशिक्षक विद्यार्थी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालिका अँड. अर्चना विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे असे या प्रसंगी सांगण्यात आले.
ग्रामीण भागात शालेय शिक्षणासाठी ची पहिली अशी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्माण करून आजचा विद्यार्थी हा उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी कौशल्य विकास आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानामध्ये ज्ञान संपादन करतील. विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धीघात होऊन येणाऱ्या काळाची पावले ओळखून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण विद्यालयात करण्याचे स्वप्न होते ते आज पुर्ण झाले असा विश्वास आपल्या प्रास्ताविकेतून डॉ. विजयराव माने चेअरमन श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव यांनी मांडला आज प्रत्येक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढत आहे त्याच उदात्त हेतूने ग्रामीण भागात सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरावर यां तंत्रज्ञानाची ओळख आणि संकल्पना रुजवणे काळाची गरज लक्षात घेऊन अँड अर्चनाताई विजयराव माने यांनी ही संकल्पना शेवटच्या विद्यार्थ्यांना मिळावी आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले हे धाडसी पाऊल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं
या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच पोलीस पाटील शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार संदीप शिंदे यांनी मानले.

 

चौकट :
तंत्रज्ञान-समृद्ध-राष्ट्र निमितीमध्ये आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य.
डॉ. विजय माने.
चेअरमन, तेजमल गांधी विद्यालय ब्राम्हणगांव .

सोबत फोटो

Google Ad
Google Ad

4 thoughts on “कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चे शालेय विद्यार्थ्यांना तेजमल गांधी विदयालयात प्रशिक्षण  व कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न तेजमल गांधी कृषी विद्यालय डॉट कॉम या वेबसाईट चे सुद्धा उद्घाटन

  1. Have you ever considered about including a little bit more than just your articles? I mean, what you say is fundamental and all. Nevertheless imagine if you added some great visuals or video clips to give your posts more, “pop”! Your content is excellent but with images and clips, this website could certainly be one of the most beneficial in its niche. Fantastic blog!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!