वसंत कारखाना येथे खासदार हेमंत पाटील यांचे सपत्नीक लक्ष्मीपूजन.

youtube

वसंत कारखाना येथे खासदार हेमंत पाटील यांचे सपत्नीक लक्ष्मीपूजन.

तीन महिन्यांत कारखाना चालू करण्याचे दिले आश्वासन.

प्रतिनिधी पोफाळी

भागवत काळे.

वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी येथे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी सपत्नीक येऊन दि.२४ ऑक्टोंबर २२ सोमवार रोजी लक्ष्मीपूजन केले.

वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या पाच वर्षापासून बंद होता. परंतु यावर्षी कर्मचारी व ऊस उत्पादक यांनी केलेल्या संघर्षामुळे वसंत साखर कारखाना पुढील पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर दिला. हा कारखाना भैरवनाथ साखर कारखाना यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. या निमित्ताने हिंगोली लोकसभा खासदार श्रीमंत पाटील व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी वसंत साखर कारखाना येथे येऊन लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्त कारखान्यांमध्ये लक्ष्मीपूजन केले व कारखान्याची पाहणी केली. लक्ष्मीपूजन निमित्त कार्यक्रमात बोलताना खासदार पाटील यांनी सांगितले की कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अनेक अडीअडचणी समोर आल्या परंतु अखेर हा कारखाना भाडे तत्वावर घेण्यात यश मिळाले. आता हा कारखाना सुरळीत चालू ठेवून शेतकरी कष्टकरी यांचे समाधान होईल यासाठी हा कारखाना योग्य प्रकारे चालविण्याचा प्रयत्न राहील. आता अधिक विलंब न लावता हा कारखाना तीन महिन्यात चालू करण्याचे प्रयत्न केले जाईल असे यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमाला नितीन भुतडा, चितांगराव कदम, भीमराव चंद्रवंशी, बाबुराव कदम, संतोषराव जाधव, गणेश घोडेकर, सोबतच शेतकरी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

चोकट:-
83 ची चौकशी सुरू करून कारखाना बंद पडण्याचे पाप करणाऱ्या दोषींना शिक्षा होईल :- नितीन भुतडा
वसंत कारखाना येथे लक्ष्मीपूजन कार्यक्रमात बोलताना बीजेपी चे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा म्हणाले की हा कारखाना बंद पाडण्याचे ज्यांनी ज्यांनी पाप केले. जो दोषी असेल त्यांना सोडले जाणार नाही. जी 83 ची चौकशी रखडली होती. ती पुन्हा सुरू होईल. अगोदरच्या सरकारने चौकशी थांबवली होती. ती 83 चौकशी पुन्हा चालू करून कारखाना बंद पाडण्याचे पाप करणाऱ्या दोषींना शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न राहील. असे यावेळी भुतडा यांनी आश्वासन दिले.

Google Ad
Google Ad

1 thought on “वसंत कारखाना येथे खासदार हेमंत पाटील यांचे सपत्नीक लक्ष्मीपूजन.

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!