हिंदूवर लाठीचार्ज ही नव्या बंगालची सुरुवात – नितीन भुतडा.
हिंदुवर लाठीचार्ज ही नव्या बंगालची सुरुवात : भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा
यवतमाळ : त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्यांसाठी राज्य सरकारने “रेड कार्पेट” अंथरले. त्यांच्या मोर्चाना परवानगी दिली. नांदेड़, अमरावती अश्या अनेक ठिकाणी हिंदुना टारगेट करण्यात आले, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, दुकाने फोडण्यात आले,दुकाने लुटण्यात आली तेव्हा पोलिस गप्प का होते? आणि आज या संपूर्ण प्रकाराला विरोध करण्यासाठी जेव्हा हिंदू रस्त्यावर उतरला तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज, पाण्याचा मारा, अश्रू गॅस,गुन्हे नोंदविने ही दुट्टपी भूमिका महाराष्ट्र पाहतो आहे. सरकारच्या धोरणाचा हा भाग असून नव्या बंगालची सुरुवात आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
निषेध नोंदविने हा सर्वांचा अधिकार, पण निषेधाच्या पदद्याआड़ कोणी माझ्या देशाचे टुकड़े करतो म्हणत असेल आणि तरीही आम्ही बघ्याची भुमिका घ्यायची ही शंढांची बोटचेपी भुमिका आमच्या रक्तात नाही. कालपर्यंत तुत्ष्टिकरणावर ज्यांच्या राजकारणाची भिस्त होती, त्यांचीही एव्हढी हिम्मत झाली नव्हती जेव्हढी आज काही “मांडुळ” सत्तेसाठी लाचार झाल्याने सरकारला मिळाली आहे. महाराष्ट्राचा बंगाल करणार अशी घोषणा करणाऱ्यानी महाराष्ट्राच्या मातीचे, हिंदूंचे आणि हिंदुत्वाचे काढलेले धिंडवडे आम्ही सहन करणार नाही. यांच्या बोटचेपी भूमिकेमुळे आज जिल्ह्यात अगदी पुसद, ढाणकी पर्यंत देशाचे टुकड़े करण्याची भाषा केली जाते जे चिंता जनक आहे. आम्ही हे सहन करणार नसून ही बंगाली काळी जादू मानसिकता मोडून काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.अशी रोखठोक भूमिका भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आहे
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?