पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर..
पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर..
नांदेड- स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे वरोरा येथे राज्यस्तरीय पत्रकारांचे एकदिवसीय खुले अधिवेशन २१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमा निमित्त पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व दीर्घकालीन कार्याबद्दल नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख श्री पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील घडामोडींचे सत्य, निष्पक्ष आणि निःस्वार्थपणे चित्रण करून आपण पत्रकारितेला नवे मूल्य आणि दिशा दिली आहे. आपल्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीसाठी आपण प्रेरणास्थान ठरला आहात. याच बरोबर पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करण्यात नानक साई फाऊंडेशन यशस्वी दुआ ठरत असून या चळवळीचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे व त्यांच्या टीमची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे मत व्यक्त करत हा जीवन गौरव पुरस्कार बोकारे यांना जाहीर केला आहे.
स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर,कार्याध्यक्ष योगेश तुरेराव,राज्य अध्यक्ष संतोष धरमकर (महाराष्ट्र),राज्य सचिव (महाराष्ट्र) आशिष घुमे यांच्या निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी, नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन चे राज्य सचिव आशिष घुमे यांनी दिली..


Honestly the variety of games here is impressive. I had a great run last weekend and the customer support was super helpful. Give brbussbet a try if you want a fair game.
Just joined last week and I am already impressed by the payout speed. It is rare to find such a transparent platform these days. Cheers to bddaka88
Super easy to navigate and the rewards are actually decent. I love how straightforward everything is here. My new go-to is jilikkklogin
Best place for those who love quick wins and easy navigation. The login process is seamless and the graphics are top notch. Try jili666login now.