जिन क्र. २ मधील १४ गाळ्यांच्या बाधकाम निवीदेचा वाद पेटलाअध्यक्षा सह उपाध्यक्षावर मनमानी चा आठ संचालकांचा पत्रकार परिषदेतून आरोप
जिन क्र. २ मधील १४ गाळ्यांच्या बाधकाम निवीदेचा वाद
पेटलाअध्यक्षा सह उपाध्यक्षावर मनमानी चा आठ संचालकांचा पत्रकार परिषदेतून आरोप
उमरखेड :
तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची ओळख असलेल्या सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनींग अँन्ड प्रेसिंग सोसायटी लि. या संस्थेमध्ये जिन क्र. २ मधील १४ दुकान गाळ्यांच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला असून संस्थेचे आठ संचालकांनी अध्यक्षांवर मनमानी कारभार केल्याचा आरोप करत तब्बल ३० ते ४० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेतून दि. १३ रोजी जिनींग अँन्ड प्रेसिंग सोसायटीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला असून, या संदर्भात सहाय्यक निबंधकांकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे मानद सचिव चितांगराव कदम, सतीश नाईक, डॉ. संजय माने, डॉ. भगवानराव देवसरकर, डॉ. संजय कदम, अतुल पाटील, कपिल चव्हाण आदी संचालक उपस्थित होते.
मानद सचिव कदम यांनी सांगितले की, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जिन क्र. २ मधील १४ दुकान गाळ्यांच्या बांधकामाचा विषय चर्चेला आला होता. संस्थेने नेमलेल्या सल्लागार अभियंता प्रणव कदम यांनी हे काम ८७५ रुपये प्रति स्क्वेअर फुट अधिक जीएसटी या दरात पूर्ण होऊ शकते, अशी माहिती दिली होती. या कामासाठी एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये सर्वात कमी दर वैभव कोसलगे यांनी १४२५ रुपये प्रति स्क्वेअर फुट असा दिला होता.
बैठकीत सर्व निविदाधारकांना कार्यालयात बोलावून निगोशिएशन करून दर कमी करण्याचे ठरले होते. मात्र, अध्यक्षांनी इतर संचालकांना विश्वासात न घेता स्वतःच टेंडर उघडून संबंधित ठेकेदाराशी केवळ २५ रुपयांची कपात करून काम मंजूर केल्याचा आरोप संचालकांनी केला. त्यामुळे संस्थेचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, यावर्षी जिनींग व प्रेसिंग युनिट बंद राहिल्यामुळे संस्थेला १२ ते १५ लाख रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी हे युनिट सुरू असल्याने १२ लाख १ हजार रुपयांचे उत्पन्न संस्थेला झाले होते. तसेच चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरणासाठी १८,९६,८८६ रुपये अदा करण्यात आले, ज्यामुळे संस्थेवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडल्याचेही नमूद करण्यात आले.
बैठकीतील ठरावाबाबतही आक्षेप नोंदवण्यात आला. सभागृहात चर्चेनुसार निर्णय नोंदविण्याऐवजी प्रोसीडिंग बुकमध्ये “सर्वानुमते ठराव” असा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित ठरावाला आपला स्पष्ट विरोध असल्याचे संचालकांनी सांगितले.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अध्यक्ष व संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. अन्यथा संस्थेच्या हितासाठी सभासदांना विश्वासात घेऊन आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुढील कार्यवाहीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
संचालका कडुन पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपाबाबत संस्थेचे अध्यक्ष शीवाजीराव माने यांची प्रतीक्रीया घेतली असता आपन पत्रकार परिषद घेऊण अशा प्रकारे करण्यात आलेल्या बिनबुडाच्या आरोपांचा संपुर्ण पुराव्यानीशी खुलासा करू असे सांगीतले.


The slots here are incredibly addictive and the jackpots are actually reachable. I had a blast playing through the levels today. Visit rumislotsgamelogin for some real fun.
The installation was a breeze. I was worried about the APK at first but it runs perfectly on my Android phone. Check out pk365downloadapk if you want a stable mobile experience.