उत्सव आनंदाने करु व प्रेमभावना वाढवू.- खंडेराव धरणे अप्पर पो.अ.

youtube

उत्सव आनंदाने करु व प्रेमभावना वाढवू.- खंडेराव धरणे अप्पर पो.अ.

[शांतता समितीच्या सभेत प्रतिपादन.]

ढाणकी/ प्रतिनीधी :

आगामी काळात येणाऱ्या धार्मिक सण, उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पो. स्टे. बिटरगांव मार्फत ढाणकी शहरात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या सभेमध्ये मार्गदर्शन करण्याकरीता अप्पर पो.अ. खंडेराव धरणे मुख्य मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. तसेच पो. उपअधिक्षक प्रदिप पाडवी, तहसिलदार आनंद देऊळगांवकर, ढाणकीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, कृ.उ.बा.स. सभापती बाळासाहेब चंद्रे, स्वीकृत नगरसेवक शे. खाजा कुरेशी, माजी जि.प. सदस्य रामराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर ढाणकी व परीसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, पो.पा. व पत्रकार बांधव हे उपस्थित होते.
येणारे सर्व उत्सव आनंदाने करुन प्रेमभावना वाढवूया. कोरोनाचं संकट अजुनही टळलं नसुन सुरक्षितता पाळूया. सर्वधर्मसमभाव जपूया. आपली संस्कृती आदर्श पध्दतीने जपूया.डीजे ऐवजी पारंपारीक वाद्यांना प्राधान्य देऊया. महिलांचा सहभाग सण उत्सवात वाढावा असे आचरण करुया. असे आवाहन यावेळी अध्यक्षीय भाषणात धरणे यांनी केले.
तहसिलदार देऊळगांवकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळेस नुकसानभरपाई १०० % भेटण्याची ग्वाही दिली.सुत्रसंचालन महाजन यांनी केले तर बिटरगांव पो.स्टे. चे ठाणेदार भोस यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने शांतता सभेची सांगता झाली.

 

https://youtube.com/channel/UCtiybT_GkkKebdAtn0tysPA

*स्वर – राज ऑर्केस्ट्रा गृप चे अधिकृत YouTube Channel.*
*नवनवीन गाण्यांच्या मनोरंजनासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करुन बेल आयकॉन दाबा.*

 

 

Google Ad
Google Ad

1 thought on “उत्सव आनंदाने करु व प्रेमभावना वाढवू.- खंडेराव धरणे अप्पर पो.अ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!