प्रत्येक घरी घरी लावु तिरंगा ध्वंज जनजागृती भव्य रॅलीचे आयोजन.

youtube

प्रत्येक घरी घरी लावु तिरंगा ध्वंज जनजागृती भव्य रॅलीचे आयोजन ..

हदगाव –
आज तामसा येथे पोलिस प्रशासन, शाळा व ग्रापंचायत तामसा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार दिनांक 13 14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवशी शासकीय कार्यालय तसेच प्रत्येक घरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज तामसा येथे जनजागृतीसाठी शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीचे सुरुवात तामसा पोलीस स्टेशन येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, तामसा एसटी बस स्टॅन्ड तिथून आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आली त्यावेळी तामसा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. मुंजाजी नामदेवराव दळवे यांनी सर्व उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. व भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन घरोघरी झेंडा लावण्याचे आव्हान विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सर्व नागरिकांना केले ही रॅली जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर हर घर तिरंगा अभियानाची राष्ट्रगीतांनी या रॅलीची सांगता झाली ही रॅली शिस्तबद्धपणे यशस्वी करण्यासाठी तामसा पोलीस कर्मचारी, शाळेतील शिक्षक वृंद,ग्राम पंचायत चे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

Google Ad
Google Ad

2 thoughts on “प्रत्येक घरी घरी लावु तिरंगा ध्वंज जनजागृती भव्य रॅलीचे आयोजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!