स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आष्टी येथे प्रत्येक घरी तिरंगा ध्वजांचे वाटप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आष्टी येथे प्रत्येक घरी तिरंगा ध्वजांचे वाटप ..
हदगांव –
तालुक्यातील आष्टी येथे आज ग्रामपंचायत येथे तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या माध्यमातून भारतीय झेंड्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी अधिक अधिक लोकांना जाणून घ्याव्यात असा सुद्धा हेतू आहे.
या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑगस्ट २०२२ रोजी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं. याशिवाय देशातील शैक्षिणक संस्थांनी ‘हर घर तिरंगा’ प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आणि इतर स्पर्धांचं आयोजन करणार आहेत ज्या माध्यमातून मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल. आपल्या घरी झेंडा लावताना सर्वांनीच झेंड्या संदर्भातील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर झेंड्या संदर्भातील २००२ च्या सुधारित नियमांनुसार राष्ट्रध्वज हा उलटा फडवला जाऊ नये. राष्ट्रध्वज जमीनीवर पडता कामा नये. राष्ट्रद्धवज फाटलेला किंवा मळलेला असू नये. याशिवाय राष्ट्रध्वजाचा वापर अंगाभोवती गुंडाळण्यासाठी करु नये. त्याचप्रमाणे राष्ट्रध्व रुमालांवर छापण्यासाठी किंवा कपड्यांवर छापू नये.
आपल्या घरात लावलेल्या झेंड्याचे फोटो नागरिकांना हर घर तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करता येतील. याच वेबसाईटवर नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही डाऊनलोड करता येईल. १ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ५० लाखांहून अधिक झेंडे छापून झाले असून या वेबसाईटवर तिरंग्यासोबत सात लाखांहून अधिक लोकांनी सेल्फी फोटो अपलोड केलेत.
काही राज्यांत स्थानिक राज्य सरकारांनी या मोहिमेला समर्थन दर्शवताना ती यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सरकारी सहकारी संस्थांना प्रत्येक सोसायटीमध्ये झेंडावंदन करण्यासंदर्भातील निर्देश दिलेत. सर्व सरकारी आणि निमसरकारी इमारतींनाही हाच नियम लागू करण्यात आलाय.
या मोहिमेत सहभागी होऊन आज आष्टी येथे ग्रामपंचायत तर्फे तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.