उमरखेड येथे अवैध सुगंधित गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
उमरखेड येथे अवैध सुगंधित गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
उमरखेड प्रतिनिधी :
तालुक्यातील मार्लेगाव येथे प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तब्बल 1,76,946 रुपयांचा सुगंधित गुटखा जप्त केल्याची घटना दि 16 फेब्रुवारी रोजी घडली . .
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मार्लेगाव येथील किसन उर्फ बाळू रमेश शिंदे व सचिन रमेश शिंदे यांनी त्यांच्या शेतातील टिनाच्या शेडमध्ये सुगंधित प्रतिबंधित गुटखा साठवलेला असल्याचे गुप्त माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळी जाऊन छापा मारण्याची कारवाई केली असता टिन शेडमध्ये संदेश विश्वास शिंदे वय वर्ष २४ वर्षे रा. मार्लेगाव हजर असल्याने व टीन – शेडची पाहणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला राजनिवास सुगंधित पान मसाला, एक्स एल 01जाफराणि तंबाखू, सागर प्रीमियम पान मसाला,एस आर 1 सेंटड तंबाखू, व्ही वन तंबाखु, मुसाफिर कंपनीची बॅग असा एकुन एक लाख 76 हजार 946 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांची कसुन चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल हा किसन उर्फ बाळू रमेश शिंदे व सचिन रमेश शिंदे यांचे मालकीचा असून त्यांनी हिमायतनगर नांदेड येथील रिजवान यांच्याकडून विक्री करिता विकत घेतला असल्याचे सांगून तो माल पोहोचण्यासाठी मी मजुरीने काम करीत असल्याचे सांगितले .
अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे यांनी आरोपीं संदेश विश्वास शिंदे वय 24 वर्ष रा. मार्लेगाव किसन उर्फ बाळू रमेश शिंदे रा. मार्लेगाव सचिन रमेश शिंदे रा. मार्लेगाव, रिजवान राहणार हिमायतनगर यांच्याविरुद्ध दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे दिलेल्या फिर्यादीवरून कलम 328 ,272, 273 भा.द.वी.सह कलम 26 (2) आय,27 (3), (ई)30 (2) अन्नसुरक्षा मानके अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कारवाई वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनात स.पो.नी. अमोल सांगळे पो.उप.नि. सागर बारस्कर . पो. हे. कॉ. सुभाष जाधव, पंकज पातुरकर, मोहम्मद सोहेल, सुनील पंडागळे, मो . ताज, दिगंबर गीते सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली .