मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव  [ ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार

youtube

मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव 

[ ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार.]

ढाणकी

ढाणकी शहरात नगरपंचायत प्रशासनामार्फत कर वसुली ही जोरात सुरु असून,यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे. तसे पाहिल्यास ढाणकी शहरातील नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा या नगरपंचायत मार्फत अजून तरी मिळाल्या नसल्याची नागरिकांची ओरड आहे. येथील रस्ते निकृष्ट दर्जाचे, आरोग्य सुविधा तोडक्या, शहराचा पाणी प्रश्न तर गेली कित्येक वर्षापासून उग्र रुप धारण करीत आहे. गंभीर असणारा पाणी प्रश्न गेल्या पाच वर्षात निकाली काढण्यात, नगरपंचायत सपशेल अपयशी ठरल्याचे सुद्धा नागरिक बोलून दाखवताना दिसत आहेत. एकंदरीत मूलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव ! ढाणकी नगरपंचायत प्रशासनाच्या अजब गजब कारभारावर ढाणकीकर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

थकलेल्या करा अभावी टेंभेश्वरनगर मधील पाणीपुरवठा नगरपंचायत तर्फे बंद 
शहरातील प्रभाग क्रमांक ७ व ८ टेंभेश्वरनगर मध्ये गोरगरीब सामान्य नागरिक राहतात. येथील गोरगरीब सामान्य जनतेची कराची थकबाकी असल्याकारणाने, ढाणकी नगरपंचायत प्रशासनाने येथील पाणीपुरवठाच बंद केला होता. परंतु माजी कृ.उ.बा.स. सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील व ढाणकीचे नागरिक यांनी त्या ठिकाणी जाऊन तो पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी प्रशासनाला केली. तद्नंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

एकंदरीत नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना सर्व मूलभूत सोयी सुविधा द्याव्या व नंतरच कर भरणा करून घ्यावा. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांशी ढाणकी येथील कृ.उ.बा. समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, ढाणकी शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल तुपेकर, ढाणकी नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार,सामाजिक कार्यकर्ते गजानन मिटकरे,ज्येष्ठ नागरिक प्रदीप मिटकरे,सोसायटी अध्यक्ष बंटी वाळके, सुभाष गायकवाड, सुनिल बुरसे,साहेबराव वाघमोडे,शेख जब्बार,आनंद पोपुलवाड,प्रवीण जैन,शेख अनिस,पंकज नरवाडे,गजानन सुरोशे, यांनी सक्तीच्या कर वसुलीच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सुद्धा नागरिकांना नाहक त्रास न देता सहकार्य करु अशी ग्वाही दिली.

बाँक्स

नगरपंचायत प्रशासनाने सक्तीची कर वसुली न करता सामान्य गोरगरीब नागरिकांचा विचार करावा. शहराला कुठल्याही मूलभूत सुविधा नगरपंचायत प्रशासनातर्फे मिळत नसून मग कर वसुली सक्तीने का ? नगरपंचायत प्रशासनाने सामान्य नागरिकांना सहकार्य करावे !

बाळासाहेब चंद्रे पाटील
माजी सभापती कृ.उ.बा.समिती

Google Ad
Google Ad

4 thoughts on “मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव  [ ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार

  1. I do trust all the ideas youve presented in your post They are really convincing and will definitely work Nonetheless the posts are too short for newbies May just you please lengthen them a bit from next time Thank you for the post

  2. Your writing is like a breath of fresh air in the often stale world of online content. Your unique perspective and engaging style set you apart from the crowd. Thank you for sharing your talents with us.

  3. Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter is palpable, and it’s clear that you pour your heart and soul into every post. Keep up the incredible work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!