उमरखेड ची बाजार समिती दिवाळखोरीच्या वाटेवर ! तरीही, स्वागतावर हजारोंची उधळण? अंदाधुंद कारभाराला आवर घालणार कोण?

youtube

उमरखेड ची बाजार समिती दिवाळखोरीच्या वाटेवर !

तरीही, स्वागतावर हजारोंची उधळण? अंदाधुंद कारभाराला आवर घालणार कोण?

उमरखेड :- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. अशाही परिस्थितीत केवळ स्वागत समारंभाच्या कार्यक्रमावर महिन्याकाठी हजारोंची उधळण करून संचालक मंडळाने आपल्या स्वैर कारभाराचा प्रत्यय दिला आहे. बाजार समीती मुख्य आवारा मध्ये गेल्या कित्येक वर्षा पासुन धान्य खरेदी बंद आहे. तात्कालीन प्रस्थापित मूठभर व्यापाऱ्यांनी बाजार समितीला वेठीस धरून आपल्या दुकानातील धान्य होणारी मान्य करावयास लावली. ती पध्दत आजतायगत सुरु आहे . आता तर केवळ शेतमालावरील तेही व्यापाऱ्यांनी घरबसल्या किंवा दुकानात बसुन खरेदी केलेल्या धान्याच्या नोंदी घेणे व त्यावरचा सेस (उपकर) गोळा करून त्यावर बाजार समितीचा कारभार चालविणे एवढेच काम उरले आहे.असे असतांना सत्ताधाऱ्यांनी महिन्याकाठी तब्बल साठ हजार रुपये स्वागत व समारंभावर खर्च केला आहे. बाजार समितीच्या या अंदाधुंद कारभारामुळे दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या बाजार समितीतील अंधाधुंद कारभाराला आवर घालणार कोण असा प्रश्न पडू लागला आहे. विशेष म्हणजे विधानसभेवर भाजपाचा आमदार असतानाही या काँग्रेस प्रणित बाजार समितीच्या संचालकाला मुदतवाढ मिळालीच कशी ? असाही कळीचा मुद्दा आता समोर आला आहे. एकंदरीतच उमरखेड बाजार समितीचा कारभार विविध कारणांनी चव्हाट्यावर आला असून या बाजार समितीच्या संचालक मंडळाला मिळालेली मुदतवाढ तातडीने रद्द करून त्यावर प्रशासकीय मंडळ बसवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वात्तविक पाहता, उमरखेड बाजार समितीचा कार्यकाळ मार्च २०२३ मध्ये संपुष्टात आला. त्यावेळी बाजार समिती ५७ लाखाने तोट्यात होती . असे असतांना जानेवारी २०२३ मध्ये स्वागत भेटी व समारंभ या बाबींवर संचालक मंडळाने तब्बल ५८ हजार रुपये खर्च केले. संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ मिळु नये यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. किंबहुना सत्ताधाऱ्यांकडूनही विशेष प्रयत्न झाले नाही. एवढेच नव्हेतर, जणू बाजार समिती च्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मुक समितीच दिली असे दिसून येते. एकंदरीत सध्या परिस्थितीत बाजार समिती कुठल्याही शेतमालाची आवक होत नाही गेल्या वर्षानुवर्षांपासून बाजार समितीचे मुख्य आवार ओस पडले आहे. त्या ठिकाणी येऊन, जाऊन काय चालतो तो दर शनिवारचा शेतकऱ्यां चा चालविला जाणारा आठवडी बाजार. त्या बाजारातून जे काय उत्पन्न होते तेवढेच काय त्या बाजार समितीचे मुख्य आवारातील उत्पन्न. असे असताना, बाजार समितीने आणखीन पाच जणांची नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. किंबहुना तो अंतिम टप्प्यात आहे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना नियुक्ती देखील मिळेल. अशी माहिती आहे. परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना डावलून या ठिकाणी नवीन नोकर भरती करून घेणे यामागे संचालक मंडळाचा काय उद्देश आहे. हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे या नवीन नोकरांकडून बाजार समिती कुठले काम करून घेणार? हे ही स्षष्ट नाही. असे पाहता, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना समितीच्या व्यापारी संकुला कडून भाड्याने दिलेल्या दुकानांचे भाडे वसूल करणे. परस्पर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्य खरेदीच्या मालावरचा सेस गोळा करणे व आठवड्यातून एकदा शनिवारी मुख्य आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी विक्रीवर कर गोळा करणे एवढे मर्यादित कामे शिल्लक असताना, आगाऊची नोकर भरती करून बाजार समितीला आणखीन आर्थिक खाईत लोटुन आपले उखळ पांढरे करून घेण्याचा संचालक मंडळचा प्रयत्न आमदार यांनी हानुन पाडावा अशी मागणी होत आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड ची बाजार समिती दिवाळखोरीच्या वाटेवर ! तरीही, स्वागतावर हजारोंची उधळण? अंदाधुंद कारभाराला आवर घालणार कोण?

  1. I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  2. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!