नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त रसिकांना मनोरंजनासाठी उमरखेड येथे महाराष्ट्राची हाश्यजत्रा.. भव्यदिव्य रोग निदान,उपचार व रक्तदान महाशिबीराचे आयोजन..

youtube

नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त
रसिकांना मनोरंजनासाठी उमरखेड येथे महाराष्ट्राची हाश्यजत्रा..
भव्यदिव्य रोग निदान,उपचार व रक्तदान महाशिबीराचे आयोजन..

उमरखेड -/

यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे वाढदिवसानिमित्त दि.7 मार्च रोजी उमरखेड विधानसभेतील नागरिकांसाठी भरगच्च आशा कार्येक्रमांचे आयोजन नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. भव्य आशा सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान प्रामुख्याने विविध वृत्तवाहिनीवरून घराघरात पोहचलेला सुप्रसिद्ध असा ‘महाराष्ट्राची हाश्यजत्रा’ विनोदी शो देखील रसिकांच्या मनोरंजनार्थ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राची हाश्यजत्रा’ हा विनोदी शो जिप. मुलाच्या शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
दि.6 मार्च रोजी महिलांसाठी भरड धान्यापासून डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन दुपारी 2 वाजता राजस्थानी भवन येथे करण्यात आले. भरड धान्य डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये,द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर दि.7 मार्च गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता राजस्थानी भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान सर्व रोग निदान व उपचार, रक्तदान महाशिबीर, महाराष्ट्राची हष्य जत्रा या विनोदी शोच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, माधुरी पवार, माया शिंदे तसेच हष्य सम्राट गौरव मोरे, अंशुमन विचारे, शिवाली परब, रोहित माने, प्राजक्ता हनमगर, प्रभाकर मोरे यासह गायक अक्षदा सावंत, चेतन लोखंडे हे सर्व विनोदी कलाकार नितीन भुतडा यांचे जन्मदिनानिमित्त उमरखेड शहरात दाखल होणार आहेत. तरीही महागाव, उमरखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी महाराष्ट्राची हाश्यजत्रा या शो मधील सुप्रसिद्ध विनोदी कलावंतांच्या कलेचा रसिकमय आस्वाद घेण्याचे आवाहन नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्येक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदक जयंत भालेकर हे करणार आहेत.
दि.9 ते 10 मार्च दरम्यान भव्य दोन दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन स्व.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल,स्विमिंग पुलाजवळ करण्यात आले आहे.सदर स्पर्धेत 35 वयोगटातील दुहेरी स्पर्धेचे प्रथम बक्षीस नऊ हजार एक रुपये,द्वितीय बक्षीस पाच हजार एक रुपये, पुरुषांच्या दुहेरी खुल्या गटात प्रथम बक्षिस नऊ हजार एक रुपये तर द्वितीय बक्षीस पाच हजार एक रुपये नियोजित करण्यात आले.

नाव नोंदणीसाठी डॉ. भारत काळबांडे-9689203205, विनोद भारसाकळे-9420104474, बालाजी चिंचोळकर-9623490730, कैलास भांडारी-9423213946 यांचेशी संपर्क साधण्यासह आयोजित सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले.

 

Google Ad
Google Ad

2 thoughts on “नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त रसिकांना मनोरंजनासाठी उमरखेड येथे महाराष्ट्राची हाश्यजत्रा.. भव्यदिव्य रोग निदान,उपचार व रक्तदान महाशिबीराचे आयोजन..

  1. Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website

  2. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!