स्टूडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडियम स्कूल,दहागाव च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

youtube

स्टूडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडियम स्कूल,दहागाव च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

उमरखेड :- आज दि. २७/०५/२०२४ रोजी नुकताच वर्ग १० वी चा निकाल जाहीर झाला असून मागील सतत १२ वर्षापासून इ.१० वी च्या १०० % निकालाची परंपरा स्टूडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडियम स्कूल दहागावच्या विद्यार्थ्यांनी कायम राखत या ही वर्षी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
चि.उत्कर्ष खूशवंतराव देशमुख ९६.२० % व ऋत्विक ओमविकास भोरे ९६.२० % गुण घेऊन शाळेतुन या दोघांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर जुफिशा ईरम इफ्तिखार उल्हा खान ९४.८० % गुण घेऊन द्वितीय व कु. इफरा हुरेन मोबिन शेख ९३.०० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला तर शाळेतील १२ विद्यार्थ्यांनी ९०. ०० % च्यावर गुण मिळविले असून उर्वरित विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले विशेष बाब म्हणजे शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्यांना कुठल्याही खासगी शिकवणी वर्ग नसताना सुद्धा विद्यार्थ्यांनी अप्रतिम घवघवीत यश संपादन केले.शाळेच्या या महत्वाच्या विषयाची तालुक्यात चर्चा होत आहे.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळेचे अध्यक्ष दर्शन तुकाराम अग्रवाल उपाध्यक्ष एन.आर.वड्डे सचिव नितीन भुतडा सदस्य डॉ प्रा.विलास चिरडे ,सौ.सपना द.अग्रवाल, व्यवस्थापक आशिष लासिनकर ,मुख्याध्यापक एम.पी.कदम ,मुख्याध्यापक विकास डोळस उपमुख्याध्यापिका पल्लवी पराते यांनी खूप खूप अभिनंदन तथा शुभेच्छा दिल्या.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “स्टूडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडियम स्कूल,दहागाव च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

  1. Hey there You have done a fantastic job I will certainly digg it and personally recommend to my friends Im confident theyll be benefited from this site

  2. Fantastic site A lot of helpful info here Im sending it to some buddies ans additionally sharing in delicious And naturally thanks on your sweat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!