उमरखेड महागाव विधानसभेत महावितरणची अभूतपूर्व कामे मंजूर उमरखेड

youtube

उमरखेड महागाव विधानसभेत महावितरणची अभूतपूर्व कामे मंजूर

उमरखेड – मागील तब्बल दोन दशकांपासून उमरखेड-महागाव विधानसभे अंतर्गतच्या गावांमध्ये विद्युत विभागाच्या कामांमध्ये प्रचंड दिरंगाई होती. तसेच सण 2003 च्या महावितरणच्या ग्राहक संख्येनुसार निर्मिलेल्या महावितरण केंद्र व उपकेंद्रावर अधिकचा भार येत असल्याने विजेचा लपंडाव सुरू असायचा यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आ.किसनराव वानखेडे, भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे प्रयत्नातून 5 व 10 एमव्हीएचे अनेक पावर ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून ते लवकरच कार्यान्वित होणार आहे.
महागाव रोडवरील उमरखेड शहर उपकेंद्रामध्ये अतिभारीत असलेल्या 5 एमव्हीए पावर ट्रान्सफार्मर च्या ठिकाणी नव्याने 10 एमव्हीएचे पावर ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.यामुळे शहवासीयांना अखंडित वीजपुरवठा करणे सुकर होणार आहे. तसेच तेथील कामाची पाहनी सुद्धा भाजपा यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितिन भुतडा, माजी आमदार विजयराव खडसे, कृ.उ.बा. स.चे संचालक विवेक कण्णावार यांनी केली.
उमरखेड येथील तिवडी फाटा उपकेंद्रावरील अतिभारीत 5 एमव्हीए च्या ट्रान्सफार्मर वरील भार कमी करण्याकरिता नवीन 5 एमव्हीए चे पावर तट्रान्सफर्मार उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे शहवासीयांना अखंडित वीजपुरवठा करणे सुकर होणार आहे.
उमरखेड शहराकरिता नवीन एक फिडर/उच्च दाब वाहिनी मंजूर करून तिचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे,त्यामुळे अतिभारीत रोहित्रा वरील वारंवार विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
तसेच कुपटी (मरसुळ), उमरखेड एमआयडीसी करिता नवीन उपकेंद्र मंजुराती करिता पाठपुरावा सुरू आहे. कुपटी येथील बारा रोडवरील सब स्टेशनसाठी दोन एकर जमिन मंजूर झाली व ती महावितरणला हस्तांतरित देखील करण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यातील या सुविधांसमवेत महागाव तालुक्यातील गुंज ते मूडाना नवीन 33 केव्हीच्या लाईनचे काम पूर्णत्वास आलेले आहे. परिणामी एकाच लाईन वरील महागाव, मूडाना वेगळे होतील आणि फुलसावंगी, भवानी हे जुन्याच लाईनवर राहतील यामुळे अतिभाराची समस्या निकाली निघेल.
काळी टेम्भी व पेढी पो.येथे नवीन 33 केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले असून त्याचे काम लवकरच प्रारंभीत होणार असल्याचे भाजपा नेते नितिन भुतडा यांचेकडून कळते. तसेच उमरखेड तालुक्यातील प्रचंड वनसंपदेचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंदीभागातील दराटी येथे नव्याने 33 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्याबाबत ऊर्जा मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली असून लवकरच त्यास मंजुरात मिळविणार असल्याचे देखील भुतडा यांनी कळविले.
अतिभारीत विद्युत केंद्राचे विभाजन करून त्यातून उपकेंद्रांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. फुलसावंगी (टाकळी) येथील 132 केव्ही च्या विद्युत केंद्राचा तोडगा लवकरच निघणार असल्याचे देखील नितीन भुतडा यांनी सांगितले.
एकंदरीत उमरखेड-महागाव या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये लघु व्यावसायिकांना तसेच शेतकऱ्यांना विद्युत विभागांकडून अप्रत्यक्ष रित्या होणारा त्रास संपुष्टात येणार आहे.

बॉक्स

अल्पावधीत सामान्य नागरिकांच्या विजे संदर्भातील बहुतांशी समस्या सोडविण्यात यश मिळाले असून पुढील दोन वर्षात शहरांसह ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगावात अखंडित विद्युत पुरवठा मिळवून देण्याचा माणस आहे.
नितीन भुतडा
भाजपा, यवतमाळ- पुसद जिल्हा समन्वयक

Google Ad
Google Ad

3 thoughts on “उमरखेड महागाव विधानसभेत महावितरणची अभूतपूर्व कामे मंजूर उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!