विजकंपनीला ८७ कोटी निधी मंजूर झाल्याने विजेचा उमरखेड विधान सभा अंतर्गंत कायम प्रश्न मार्गी लागला  ▪️आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती

youtube

विजकंपनीला ८७ कोटी निधी मंजूर झाल्याने विजेचा उमरखेड विधान सभा अंतर्गंत कायम प्रश्न मार्गी लागला
▪️आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती

उमरखेड –

महाराष्ट्र शासनाच्या बि ओ टी तत्वावर विकसीत होणाऱ्या राज्यातील ९८ बसस्थानकामध्ये उमरखेड बसस्थानकाचा समावेश करण्यात आला असल्याने उमरखेडच्या सौदर्यीकरणात मोठी भर पडणार आहे तसेच विजवितरण कंपनीमध्ये गावठाण आणि एजी यांचे वर्गीकरण करण्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे महागाव व उमरखेड तालुक्यातील विज समस्येचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे मागील ६० ते ७० वर्षापासूनच्या उमरखेड विधानसभेतील जटील समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी आज दिनांक २३ रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत सांगीतले .

विज वितरण कंपनीमध्ये गावठाण आणि एजी यांचे वर्गीकरण करण्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे . त्यामुळे ए जी पंपाला सतत आठ तास पुर्ण दाबाने तर गावांना २४ तास सुरळीत विज पुरवठा होणार आहे असे सांगून आमदार ससाने म्हणाले की, उमरखेड व महागाव तालुक्यात नवीन १८० ट्रान्सफार्मर मंजूर झाल्याने दोन्ही तालुक्यातील ८० टक्के गावांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे तर गावठाणला त्री फेस सप्लाय होणार आहे .
विजेची समस्या ही महागाव तालुक्यातली मोठी समस्या होती ती १३२ केव्ही चे सबस्टेशन फुलसावंगी इसापुर येथे मंजूर झाले असून टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली आहे .
त्याचबरोबर दोन्ही तालुक्यात शंभर – शंभर एकर जागेवर सौर उर्जा प्रकल्प मंजूर झाले असल्याचे सांगीतले .
उमरखेड बसस्थानकाबाबत माहिती देतांना आ. ससाने यांनी सांगीतले की, उमरखेड बसस्थानकाच्या आतमधल्या परिसराची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती त्यामुळे उद्योग मंत्रालयातून पाठपुरावा करून ३ कोटी रुपयाचा निधी कॉन्क्रीटीकरणासाठी आणला असून काम पुर्णत्वाकडे आहे . त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या बिओटी तत्वावर विकसित होणाऱ्या बसस्थानकाच्या यादीत उमरखेड बसस्थानकाचा समावेश करण्यात आला असून बसस्थानकाच्या समोरच्या बाजुने व्यवसायीक संकुल तर आतमध्ये बसस्थानक राहणार आहे .
वरच्या मजल्यावर पुन्हा व्यवसायीक संकुल व त्याच्यावरती लॉजींग राहणार आहे शेवटच्या मजल्यावर रुफ टॉक हॉटेलची निर्मीती होईलअसा डिपीआर बनविण्याचे काम सुद्धा शासनाने नेमुन दिलेल्या एजन्सीकडे दिला आहे .
त्यामुळे शहर सौदर्यीकरणात मोठी भर पडणार आहे एवढेच नव्हे तर उमरखेड आगारास १० डिझेल बसेस व २९ इलेक्ट्रीक बसेस अशा एकूण ३९ बसेस मिळणार आहेत तसेच अद्यावत चार्जींग पॉईंट देखील मंजूर झाला असल्याचे यावेळी आमदार ससाने यांनी सांगुन विधानसभेत दहा हजार घरकुल मंजूर करून आणले असून गरिबांच्या घरांची स्वप्ने पुर्ण होणार असल्याचे सांगून बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा यावर आधारीत उमरखेड विधानसभेचा विकास होणार असल्याचे शेवटी सांगीतले या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा , प्रकाश दुधेवार, दत्त दिगांबर वानखेडे, शैलेश मुंगे उपस्थित होते .
सोबत फोटो –

पत्रकार परिषदेत माहिती देतांना आ. नामदेव ससाने

Google Ad
Google Ad

6 thoughts on “विजकंपनीला ८७ कोटी निधी मंजूर झाल्याने विजेचा उमरखेड विधान सभा अंतर्गंत कायम प्रश्न मार्गी लागला  ▪️आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती

  1. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do so Your writing taste has been amazed me Thanks quite nice post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!