उमरखेड महागाव तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झालेले रस्ते होणार लवकरच दुरुस्त – आमदार नामदेव ससाने
उमरखेड महागाव तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झालेले रस्ते होणार लवकरच दुरुस्त – आमदार नामदेव ससाने
उमरखेड –
उमरखेड/ महागाव तालुक्यामध्ये दि. २२, २३ जुलै, २०२३ रोजी अतिवृष्टी (ढगफुटी) मुळे रस्त्यांचे व पुलांचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन खूप मोठ्या प्रमाणात पूल खचले होते रस्ते,खराब झाले होते त्या बाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार ससाने यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि श्री रविंद्रजी चव्हाण सा. बांधकाम मंत्री यांना पत्राद्वारे कळवुन परिस्तिथी विषद केली होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्यातमध्ये अतिवृष्टी (ढगफुटी) मुळे रस्त्यांचे व पुलांचे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेत” या पत्राची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मा.मंत्री,महोदयांच्या सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याच्या सूचना केल्यात .त्या अनुषंगाने सदर बैठक मंगळवार, दिनांक २६.सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३.०० वा. मा.मंत्री महोदयांचे दालन मंत्रालय, मुंबई येथे आयोजीत करण्यात आली आहे,
सदर बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांना उपस्थित राहणे संदर्भात सुचना करण्यात आल्यात तसेच बैठक झाल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त मा. मंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी दोन दिवसात सादर करणेबाबत मा. मंत्री महोदयांचे निर्देश आहेत. या बैठकी मुळे उमरखेड महागाव तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झालेले रस्ते दुरुस्त होऊन लवकरच नागरिकांची होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.