आरक्षण मागणी करनार्‍या मराठा समाज बांधवांचा खासदार यांना पोफाळी गांवात घेराव ; खासदार हेमंत पाटिल यांनी आरक्षणास समर्थन दर्शवित पदाचा राजीनामा ! राजीनामा सत्रामुळे सरकार वर दबाव वाढला.

youtube

आरक्षण मागणी करनार्‍या मराठा समाज बांधवांचा
खासदार यांना पोफाळी गांवात घेराव ; खासदार हेमंत पाटिल यांनी आरक्षणास समर्थन दर्शवित पदाचा राजीनामा !
राजीनामा सत्रामुळे सरकार वर दबाव वाढला …

उमरखेड –
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेंमत पाटिल हे पोफाळी येथे काही कामा निमिताने रविवारी २९ ऑक्टोंबर ला दुपारी आले असतांना आरक्षण मुद्यावर आक्रमक असलेल्या मराठा समाज बांधवांनी त्या स्थळी धाव घेऊन खासदार पाटिल यांचा ताफा अडवून घेराव घातला होता
प्रत्येक गांवा गांवात अगोदर च पुढारी नेत्यांना गांव बंदी ची भूमिका घेत गांव रस्ता तोंडावर गांव बंदी चे बॅनर लावले आहेत अशातच सकल – मराठा समाजांनी उमरखेड मध्ये आमरण उपोषण मागील शनिवार पासुन सुरु केले आहे , राजीनामा द्यावा या मुद्यावर अंदोलक आक्रमक होते घेराव कायम होता शेवटी समाज बांधवाच्या आरक्षण मुद्याच्या बाजूने असून या संदर्भात दोन दिवसात दिल्ली येथे मी पण उपोषण करेन असे म्हणून शेवटी खासदार हेमंत पाटिल यांनी स्वत : याच वेळी लोकसभा अध्यक्ष यांच्या कडे राजीनामा पाठविला आणि आरक्षण मुद्याला समर्थन दर्शविले
मराठा आरक्षण मागणी मुदा आता चिघळता झाला असुन राजीनामा सत्र वाढते झाले असल्याने सरकार वर दबाव वाढला असल्याचे चित्र तयार होत असतांना दिसत आहे
———-

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!