जुन्या निवृती वेतन कर्मचारी बांधवांचा विविध मागण्या समोर करित धिक्कार मोर्चा तहसिल समोर धडकला – एकवटलेले बहुसंख्य कर्मचारी झाले होते सामील.
जुन्या निवृती वेतन कर्मचारी बांधवांचा विविध मागण्या समोर करित धिक्कार मोर्चा तहसिल समोर धडकला – एकवटलेले बहुसंख्य कर्मचारी झाले होते सामील
उमरखेड –
निमसरकारी, खाजगी क्षेत्रातील संघटीत
असंघटित कर्मचारी बेरोजगार, पेन्शनर्स व शेतकरी कृती समिती यवतमाळ अंतर्गत उमरखेड तालुक्यातील कर्मचारी संघटनांची सुकाणू समिती उमरखेड यांच्या वतीने रविवारी २९ ऑक्टोबर ला धिक्कार मोर्चाचे आयोजन
करुन विविध मागण्या समोर करित मोर्चा जि. प. माध्यमिक मुलांची शाळा, उमरखेड येथून निघुन माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मार्ग क्रमण करित तहसील कार्यालय प्रांगणात धडकला नंतर मोर्चाचे रूपातंर सभेत झाले होते
या मोर्चात
विविध कर्मचारी संघटना यांनी शिक्षक संघटना, शिक्षकेत्तर संघटना आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बेरोजगार शेतकरी
बहुसंख्ने कर्मचारी सामील झाले होने हा मोर्चा शेतक-यांचा मालास हमी भाव मिळावा स्वामीनाथन आयोग लागू करावा , कंत्राटीकरण /खाजगीकरण बंद करावे , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शा.पो. कामगार, उमेद कर्मचारी यांना किमान २६ हजार वेतन लागू करावे स्पर्धा परीक्षेचे शुल्क एक हजार ऐवजी किमान दोनशे रुपये करण्यात यावे शाळा दतक योजना व समूह शाळा योजना बंद करावे, ई पी एस कर्मचान्यांना किमान 9000 रु. महागाई भत्त्ता सह
पेन्शन देण्यात यावे ,
तसेच सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी
पेन्शन योजना लागू करावी , या मागन्याच्या घोषणा देऊन परिसर दणाणून काढला होता मोर्चा यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीचे प्रमुख विजय मुंगे , नियंत्रक दिपक चव्हाण , बाहेर ठिकाणा वरून ,
आलेले निरीक्षक तेजस तिवारी , संयोजक अमोल पाईकराव , योगेश
सुरोशे, विष्णु दुधे , पुष्प जीत राणे , गोविंद साबळे , परशराम कर्णेवाड , अरुण बुरुकुले , शिवाजी देवसरकर सह इतर सर्व संघाचे अध्यक्ष व सचिव यांची व पदाधिकारी यांनी सहभाग घेवून धिक्कार मोर्चात सामील झाले होते.