एक तर्फी प्रेमातून रामपूर येथील युवतीचा खून.
एकतर्फी प्रेमातुन रामपुर येथील युवतीचा खुन
पुसद –
तालुक्यातील रामपुर येथे राहणाऱ्या युवतीचा एकतर्फी प्रेमातुन चाकु व गुप्तीने खुन केल्याची खळबळ जनक घटना दि.१५ मे च्या सकाळी ९.३० वाजता घडली आहे.
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपुर (सावरगाव गोरे) येथे राहणारी सुवर्णा अर्जुन चव्हाण वय (२१) वर्षे असे खुन झालेल्या युवतीचे नाव आहे.
सुवर्णा चव्हाणचे आई,वडील,भाऊ बाहेरगावी लग्नाला गेले असल्याचे माहीत होताच गावातच राहणारा आरोपी युवक आकाश श्रीराम आडे वय (२५) वर्षे याने एकतर्फी प्रेमाच्या रागातून युवतीच्या घरात घुसुन युवतीच्या पोटात चाकु व गुप्तीने वार करून जखमी केले.यातच युवतीचा जागीच मृत्यु झाला.
युवतीला जिवाने मारल्याची माहिती वाऱ्या सारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला याबाबद माहिती दिली.त्यानंतर खंडाळा पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले.
युवतीला मारणारा आरोपी हा घटनास्थळून फरार झाला असता त्याला धनसळ येथील जंगलातुन पकळण्यात आले. युवतीच्या आई,वडील व भावाला याबाबत माहिती देण्यात आली असुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी विरोधात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.