खाऊचे आमिष देत नराधमाचा दोन चिमुकल्या वर पाशवी अत्याचार.

youtube

खाऊचे आमिष देत नराधमाचा दोन चिमुकल्यांवर पाशवी अत्याचार.
आरोपी फरार

उमरखेड

एका नराधमाने कुठलेही भान न ठेवता मुलीच्या वयाच्या दोन चिमुकल्यांना पैशाचे आमिष देत पाशवी अत्याचार केला. समाजमन सुन करणारी ही बिभत्स घटना तालुक्यातील साखरा येथे मंगळवारी २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ च्या सुमारास घडली या घटनेने प्रचंड रोष व्यक्त होत आहे

बालाजी ऊर्फ बाळू
श्यामराव भोळे (४०) रा साखरा असे दोन चिमुकल्यानवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे आई वडील शेतात कामासाठी गेलेले 28 फेब्रुवारीला सायंकाळी आजीकडे खेळत असलेल्या एक सहा वर्षीय चिमुकलीसह तिच्या चार वर्षीय मैत्रिणीला नराधम बाळूने खाऊचे पैशाचे आम्हीच देत घरात बोलावले. त्यानंतर घराच दार बंद करत त्याने कुठलेही भान न ठेवता त्या दोन्ही चिमुकल्यांवर पाशवी अत्याचार केला ही बाब त्या सहा वर्षे पीडित चिमुकलीच्या आठ वर्षे भावाच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी ही बाब आजीला जाऊन सांगितले त्यानंतर त्याची आजी नराधम बाळूच्या घरी गेली यावेळी तिने घराचे दार ठोठावले मात्र कुणाचाही आवाज आला नाही त्यानंतर तिने त्या दोन्ही चिमुकल्यांची नावे घेत जोर जोराने हाका मारल्या मात्र तरीही चिमुकल्या बाहेर आले नाही त्यामुळे गैरसमज झाला समजून ती आजी परत घराकडे निघाली तेव्हा दोन्ही चिमुकल्या नराधम बाळूच्या घरातून निघाल्या तेव्हा त्या आजीने आणि शेजारी महिलांनी त्या चिमुकल्या दोघींना विचारणा केली परंतु घाबरलेल्या चिमुकल्यांनी काहीच सांगितले नाही मात्र त्यानंतर थोड्या वेळाने दोघींनीही घडला प्रकार कुटुंबीयांकडे कथन केला त्यानंतर नाराधम बाळूची दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध केली मात्र तो पसार झाला होता घटना उजेडात आल्या नंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी पीडित चिमुकल्यांना सोबत घेत उमरखेड पोलिस ठाणे गाठले तसेच याप्रकरणी संयुक्त तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी पीडित दोन्ही बालिकांचे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला त्यावरून पोलिसांनी नराधम बाळू भोळे त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले, या समाज मन सुन्न करणाऱ्या घटनेची वार्ता समजताच परिसरातील नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे सदर प्रकरणाचा तपास उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्ग दर्शनाखाली उमरखेड चे ठाणेदार अमोल माळळे पीएसआय नारायण पांचाळ सहित बीट जमादार संतोष चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!