चक्क भरदिवसा पेट्रोल पंपावर पडला दरोडा महागाव तालुक्यातील घटना खळबळजनक

youtube

चक्क भर दिवसा पेट्रोल पंपावर पडला दरोडा महागाव तालुक्यातील घटना खळबळजनक

महागाव तालुक्यातील खडका येथे अवघ्या एका महिन्यापुर्वी नव्याने सुरू झालेल्या पेट्रोल पंपावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकल्याने महागाव तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे..

खडका येथे नागपूर तुळजापूर या महामार्गावर किसनराव देशमुख यांनी श्री दत्त पेट्रोलियम या पेट्रोल पंप सुरू केला, दिनांक १ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका दुचाकी वर तीन जण हे तोंडाला रुमाल बांधून पेट्रोल टाकण्यासाठी आले गाडीत पेट्रोल टाकल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पैसे मागीतले मात्र या युवकांनी बंदुक काढून कर्मचारी याचे हातातली पैशाची बैग जयामध्ये अंदाजे ५० हजार रुपये होते हिसकावून घेतली व दुचाकी वरुन पळ काढला.

घटनेची माहिती महागाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली.महागाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरा विरुद्ध भांदवि ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार विलास चव्हाण हे अधिक तपास करीत आहे..

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!