एनडीआरएफचे चिंचोली (संगम) येथे बचावकार्य नमो महाराष्ट्र

youtube

एनडीआरएफचे चिंचोली (संगम) येथे बचावकार्य

नमो महाराष्ट्र

मुळावा प्रतिनिधी-:उमरखेड तालुक्यातील चिंचोली (संगम) गावाला १८ ऑगस्ट रोजी पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी ढगफुटी अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन परिणामी अनेक घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. तसेच शेतातील उभी पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने उध्वस्त झाली.
उमरखेड उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांनी चिंचोली (संगम) येथील एनडीआरएफ पथकासह पूरस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांना शासकीय स्तरावर सर्व मदत पुरविल्या जाईल अशी प्रशासनाकडून हमी देण्यात आली.
यावेळी शेतीचे कुठलेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी तलाठी वर्ग तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!