प्रतिकूल परिस्थिती वर मात 10 वित यश राणीला न्यु झंकार गणेश मंडाळने दिला मदतीचा हात.
प्रतिकूल परिस्थिती वर मात 10 यश राणीला न्यू झंकार गणेश मंडळाने दिला मदतीची हात.
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या न्यू झंकार गणेश मंडळाने दिला राणी मोरे ला पुढील शिक्षणासाठी मोबाईल
उमरखेड..
उमरखेड येथील गुरुदेव गोरोबा विद्यालयातील कु . राणी गजानन मोरे या विद्यार्थीनीने अत्यंत प्रतिकूल परीस्थीती मध्ये शिक्षण घेवून दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून यशाचे शिखर गाठले आहे.
स्थानिक महात्मा फूले वार्डातील कु .राणी गजानन मोरे ही विद्यार्थीनी येथील गुरुदेव गोरोबा विद्यालयामध्ये वर्ग ५ वी पासून शिक्षण घेत होती. घरची अत्यंत हालाखीची परीस्थीती यातच सन २०११ मध्ये अचानक वडीलाचा आकस्मीत मृत्यू झाल्याने वडीलाचे पितृछत्र हरवलेल्या राणी मोरे या विद्यार्थीनीने धैर्य व चिकाटी ठेवून व परीस्थीती वर मात करून दहावीच्या परीक्षेत ९४ % गुण मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. घरची अत्यंत बिकट परीस्थीती, घरी आई व दोन लहान बहीनी, घरात राहण्यासाठी फक्त एकच खोली, आई अशिक्षीत असल्याने केवळ रोज मजूरी करुन घरचा प्रपंच चालविणे व तीन मुलीना शिक्षण देणे हे आईचे काम त्या मुळे अभ्यासात मार्गदर्शनाचा अभाव असताना सुद्धा कु . राणी मोरे या विद्यार्थीनी ने परीस्थीतीचे भान ठेवून दहाव्या वर्गात चिकाटीने अभ्यास करून परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेवून यशाचे शिखर गाठले आहे. कु. राणी मोरे या विद्यार्थीनी च्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाचा भार हा न्यू झंकार गणेश मंडळाने उचलला आहे. कोरोना सारख्या महामारी मुळे शाळा कॉलेज बंद असल्यामुळे सध्या ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत अश्या मध्ये राणी हिला स्मार्ट फोन घेणे शक्य नव्हते ही बाब न्यू झंकार गणेश मंडळाच्या लक्ष्यात येताच त्यांनी विवो कंपनी च्या स्मार्ट फोन मोबाईल घेऊन कु. राणी मोरे हिला दिला. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संजोग भवनचे संचालक गणेश भाऊ रावते, ऍड. चेतन मळावे, अनिल भाऊ झांबरे, महेश ताकतोडे, न्यू झंकार गणेश मंडळाचे अध्यक्ष ब्रम्हा शिंदे, सचिव अंकुश पानपट्टे, अर्जुन लंगोटे, गणपत बोरकर, व अदी न्यू झंकार गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दानशुर व्यक्तिंनी समोर ऐण्याची गरच ! अंकुश पानपट्टे
ज्या प्रमाणे न्यु झंकार गणेश मंडळाने होतकरु ,गरजुवंत मुलीच्याशिक्षणाची जवाबदारी उचलली व समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला.त्याच प्रमाणे आपल्या आसपास अनैक अशें होतकरु,गरजुवंत विद्यार्थी आहेत कि आपल्या परिस्थिती मुळे शिक्षण ना पासून वंचित आहेत.अशा विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व जानुन आपन मदत करत पुढे ऐण्याची आज खरी गरज आहे .ज्या मुळे होतकरु विद्यार्थी हे शिक्षना पासुन वंचित राहणार नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी समोर येण्याची गरज आहे- अंकूश पानपट्टे सचिव न्यू झंकार गणेश मंडळ,