बरडशेवाळा येथे यशवंत सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न मराठवाडाप्रमुख नागोराव शेंंडगे यांच्या उपस्थित नुतन कार्यकरणी संपन्न. .
बरडशेवाळा येथे यशवंत सेनेच्या नुतन पदाधिका-यांचा सत्कार सोहळा संपन्न….
मराठवाडा प्रमुख नागोरावजी शेंडगे यांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारीणीची निवड
बरडशेवाळा…
समस्त धनगर समाजाची आस्मिता जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य करणा-या ‘यशवंत सेने’च्या हादगाव तालुका कार्यकारिणीची महत्वपुर्ण बैठक बरडशेवाळा येथे पार पडली. असून यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात नुतन सभासदांची निवड तसेच असंख्य जनसमुदायासमोर सत्कार सोहळा संपन्न झाला.
दि.१४ फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील मौजे बरडशेवाळा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश नाईक हे होते. तर यशवंत सेनेचे विदर्भप्रमुख अशोक नाईक यांच्यासह मराठवाडा संघटक सुभाष नाईक, सुभाष बोडके, लातूर जिल्हाप्रमुख माधव देवकाते, संपर्क प्रमुख मनोज अनुसे, केशव खांडेकर, बाळासाहेब माधवराव नाईक, बापुराव पाटील हराळे आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम राजमाता पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून उपस्थित पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच नुतन पदाधिका-यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमास लाभलेले यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापु यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत श्रीमंत सुभेदार महाराज यशवंतराव होळकर यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकताना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हमाले की, ज्या राजाने सतत अठरा लढाया लढताना एकही लढाई न हारता प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडले त्यांचा आदर्श पुढे ठेवून बि. के. कोकरे यांनी धनगर समाजाची आस्मिता जागृत करण्याचे काम ज्या माध्यमातून केले ती म्हणजे यशवंत सेना होय. आणि यशवंत सेनेच्या माध्यमातूनच प्रस्थापितांची झोप उडवण्याचे काम आजवरही सुरू आहे. यावेळी अनेक मान्यवरांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाईक यांनी तर आभार प्रदर्शन राजू नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास मस्के यांच्यासह संदिप हापगुंडे, हनुमान मस्के, अनिल नाईक, पुंजाराव लकडे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले…..
Some truly good content on this website , thanks for contribution.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.