कृषिपुत्रांची अवहेलना सहन करणार नाही- नितीन भुतडा.

youtube

कृषिपुत्रांची अवहेलना सहन करणार नाही : नितीन भुतडा

यवतमाळसह विदर्भावर अन्याय
10000 कोटिंच्या पैकेजमध्ये डावलले

प्रतिनिधि / 4 नोव्हेम्बर
यवतमाळ : परतीच्या पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहिर करण्यात आलेल्या दहा हजार कोटिंच्या पैकेजमधून यवतमाळसह विदर्भाला डावलले आहे. मदतीच्या निकषात जिल्ह्यातील बोटावर मोजन्याईतके शेतकरी पात्र ठरणार असून उर्वरित वैदर्भीयांच्या तोंडाला पाणे पुसल्या जाणार असून हा अन्याय सहन करणार नसून ठाकरे सरकारने पुनर्विचार न केल्यास जनआंदोलन उभारु असा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून दिला आहे.
सुरुवातीला पावसाने मारलेली दड़ी त्यानंतर बोगस बियाने आणि आता घास हाता तोंडाशी आलेला असताना परतीच्या पावसाने केलेली धूळधान यामुळे शेतकरी मेटाकुटिस आलेला आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यावर मलम म्हणून महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेली मदत थोडासा आधार होईल अशी अपेक्षा असताना सरकारने मात्र यवतमाळसह वैदर्भीयांची पुरती निराशा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 16 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानिची भरपाई म्हणून जाहिर करण्यात आलेल्या पॅकेज बाबत धोरण, नियम निकष जाहिर केलेत, ज्यात शेती आणि घरे इत्यादींच्या नुकसानि संदर्भात केलेल्या तरतुदी दिलेल्या आहेत. या शासन निर्णयात विदर्भात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या कोणत्याही जिल्ह्यात आणि नागपूर विभागातील नागपुर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, व वर्धा जिल्ह्यामध्ये गंभीर नुकसान झाले नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
परतीचा अती पावसाने झालेल्या पीक नुकसानात विद्यमान महाआघाडी सरकारने विदर्भातील अकरापैकी फक्त एकाच जिल्ह्यात नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढून उर्वरित जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत केवळ भंडारा या एकाच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यावरून या तिघाड़ी सरकारमध्ये सुरु असलेले दबावतंत्राचे राजकारण स्पष्ट होते. पश्चिम महाराष्ट्रातील नेते सर्वांगीण दृष्ट्या ताक़दवान असल्याने त्यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रासाठी भरीव मदतीची तरतूद केली आहे, त्यातुलनेत विदर्भात सत्तेत असलेले नेते प्रभावशून्य ठरल्याचे यातून स्पष्ट होते.
या सर्व अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण विदर्भाचे अतिवृष्टीमुळे शेती, घरे, झोपड्या गोठे, जनावरे, अशा विविध प्रकारांमध्ये सर्वमिळून केवळ 7 कोटी 22 लक्ष 90 हजार नुकसान झाले आहे. म्हणजेच उद्धव सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भाच्या वाट्याला फक्त 7.22 कोटीच रुपये येणार आहेत. याचाच अर्थ ठोकळमनाने 10 हजार कोटींपैकी 9 हजार 998 कोटी रुपये विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात वाटल्या जाणार आहेत. माध्यमांनी गळा काढ़ल्यानंतर नाही म्हणायला एक शुद्धीपत्रक काढण्यात आले ज्यात 10 लाखांची मदत वाढविन्यात आली आहे. ज्यामुळे 10 हजार कोटींच्या एकूण पॅकेज पैकी जे 7 कोटी 22 लाख 90 हजार रुपये संपूर्ण विदर्भाला मिळणार होते. ते आता 7 कोटी 32 लाख 90 हजार रुपये मिळणार आहे. उर्वरित महाराष्ट्राला आणि विदर्भ यांच्यात 10 हजार कोटींचे होणारे वाटप प्रचंड विसंगत असून यात विदर्भावर विशेषतः कृषिपुत्रांचे स्मशान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. यातून महाविकास आघाडी सरकारचे शेतकऱ्याप्रति असलेले पूतना मावशिचे प्रेम चव्हाटयावर आले असून सरकारने याबाबत फेरविचार करून शेतकऱ्यांना योग्य मदत करून सन्मान करवा अन्यथा उग्र जनआंदोलन उभारु असा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!