बेलखेड – आमला शिवारात भूसंपादन मोजणी शेतकऱ्यां नी थांबविली उमरखेड –

youtube

बेलखेड – आमला शिवारात भूसंपादन मोजणी शेतकऱ्यां नी थांबविली

उमरखेड –
शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक व बागायती शेती उद्ध्वस्त होत असून शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत या पार्श्वभूमीवर बेलखेड परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवार रोजी ११ वाजताच्या सुमारास शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला महामार्ग कायमस्वरुपी रद्द करावा, या मागणीसाठी शेतजमिनींची मोजणी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी बेलखेड भू संपादित होत असलेल्या मालक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे बेलखेड येथे मार्ग संपादित जमीन ची मोजणी करिता तहसिल विभागाचे नायब तहसिलदार पंडित , मंडळ अधिकारी शिवनकर आणि संबंधीत तलाठी मोजमाप विभागाची टिम पोहोचली तेंव्हा मज्जावकर्त्या २० – २५ शेतकऱ्यांना पोलीस प्रशासना मार्फत उपविभागिय कार्यालयात दिवसभर स्थान बद्द करण्यात आले आणि संबंधीत मार्ग संपादित जागेची मोजणी झाली यावेळी संबंधीत शेतकऱ्यांनी जुलमी प्रशासनाचा जाहिर निषेध केला यावेळी
बेलखेड शिवारात होणाऱ्या भूसंपादनामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी बेघर व भूमिहीन होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे हा महामार्ग पर्यावरणदृष्ट्या घातक असून भविष्यात बाधित गावांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करत मोजणी पथक शेतात येऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे ९ फेब्रुवारी रोजी याच प्रश्नां विषयी आमला शिवारातील शेतकऱ्यांनी या संदर्भात भूसंपादन अधिकारी व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे
शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात बेलखेड व आमला परिसरातील शेतकरी एकवटले असून, प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन भूसंपादन व मोजणी प्रक्रिया थांबवावी व महामार्ग रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे
सोबत –
फोटो जोडला

Google Ad
Google Ad

1 thought on “बेलखेड – आमला शिवारात भूसंपादन मोजणी शेतकऱ्यां नी थांबविली उमरखेड –

  1. Tỷ lệ hoàn trả (cashback) tại 66b app lên tới 1.5% mỗi tuần – chơi càng nhiều, hoàn càng lớn. Đây là lợi thế vượt trội so với các nhà cái khác. TONY02-11O

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!