सखी बायको व पोटच्या मुलाने केली बापाची निर्घृण हत्या बिटरगाव हद्दीतील धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा : आरोपी दोन पोलिसांच्या ताब्यात
सखी बायको व पोटच्या मुलाने केली बापाची निर्घृण हत्या
बिटरगाव हद्दीतील धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा : आरोपी दोन पोलिसांच्या ताब्यात
उमरखेडः सहस्रकुंड धबधब्या जवळील पैनगंगा नदीपात्रात एका पिवळ्या रंगाच्या फारीत (पोत्यात) बांधलेल्या स्थितीत मिळालेल्या त्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नी आणि मुलानेच मिळून मारोती गंगाराम डुकरे (रा. जलधरा, जि. नांदेड) यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी मायलेकांना बेड्या ठोकल्या आहेत.
असह्य जाचाला कंटाळून मायलेकाने केली हत्या
दारूचा जाच मृतक मारोती डुकरे हे नेहमी दारू पिऊन घरात पत्नी आणि मुलांना त्रास द्यायचे. त्यांच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्नी आणि मुलाने मिळून त्यांचा काटा काढला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फारीत बांधून नदीत फेकून दिला
प्रदीप मारोती डुकरे (वय २५) (मृतकाचा मुलगा), पार्वतीबाई मारोती
डुकरे (५५)
(मृतकाची पत्नी) असे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
९ जानेवारी २०२६ रोजी बिटरगाव
मिसींग तक्रार नव्हतीच माहितीवरुन उलगडा
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी चार पथके तयार केली. ५० किमी परिसरातील सर्व बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करत असताना, किनवट (जि. नांदेड) जिल्ह्यातील जलधरा येथील मारोती डुकरे हे बेपत्ता असल्याची गोपनीय माहिती मिळाली. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही मिसिंग तक्रार नोंदवली नव्हती.
संशयाची सुई अन् गुन्ह्याची कबुली
पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू यांचे पथक तातडीने जलधरा येथे पोहोचले. मारोती यांच्या पत्नी आणि मुलाची चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरली गाव शिवारात पैनगंगा नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यात एक ३० ते ४० वयोगटातील
पुरुषाचा मृतदेह पिवळ्या फारीत बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.


I’ve tried many sites but this one feels the most secure. Withdrawal is quick and easy without any hidden fees. Go to vnxx88n and see for yourself.
If you are looking for a stable and exciting gaming platform then look no further. I have been using krm4win for a week and it is fantastic.