‘अधिकारी घडवा घरोघरी’ पुस्तकाचे प्रकाशन.

youtube

नागापूर (प) येथे अधिकारी घडवा घरोघरी’ पूस्तकाचे प्रकाशन

उमरखेड(प्रतिनिधी)

उमरखेड-ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थांना स्पर्धा परिक्षेची आवड निर्माण होऊन तो अधिकारी बनला पाहीजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आनंद देशमुख यांनी लिहलेल्या ‘ अधिकारी घडवा घरोघरी ‘ या पुस्तकाचे प्रकाशन उमरखेड तालुक्यातील प्रशासकीय सेवेत असणा-या भुमीपत्र अधिकारी व पदाधिका-यामार्फत करण्यात आले .
तालुक्यातील नागापूर (प) येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजीत शिक्षकांची प्रेरणा कार्यशाळेत पस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाने तर प्रमख उपस्थिती जि.प.यवतमाळ चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर ,अमरावती विभागाचे सेवानिवृत्त उपायक्त संभाजी राणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी ,नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ अंकश देवसरकर , नगर परिषदेचे शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके, शिक्षण समिती सदस्य मधकर काठोळे, प्रा डॉ. वि ना कदम, गटशिक्षणाधिकारी पांडरंग खांडरे ,माजी गटशिक्षणाधिकारी एन आर वड्डे, पं स माजी सभापती सविताताई कदम, नागापूरचे उपसरपंच गोदाजी जाधव व अनेक मान्यवर मंडळी प्रामख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यशाळेचे आयोजक जि.प सदस्य चितांगराव कदम यांनी आनंद देशमख सरांनी पूस्तकाद्वारे व्रत विद्यार्थाप्रती जोपासत असल्याबाबत कौतक कैले .
आनंद देशमख यांनी आपल्या पुस्तकाद्वारे जे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या बिजावरोपनाचे कार्य हाती घेतले ते अभिनंदनिय असल्याचे मत आमदार नामदेव ससाने यांनी व्यक्त केले . उमरखेड तालक्यातील भुमीपूत्र डॉ .अंकश देवसरकर , सेवानिवृत उपायुक्त संभाजी राणे व जिल्हा शिक्षणाधिकारी प्रमोद सर्यवंशी यांनी आपल्या भाषणात आनंद देशमख यांच्या या ध्येयवेड्या उपक्रमाबाबत प्रशंसा केली .
पूस्तकाचे लेखक आनंद देशमख यांनी पूस्तक लिहण्यामागील उद्देश स्पष्ट करीत उमरखेड पंचायत समितीमधील सर्व जि प शाळांना ही पूस्तके मोफत देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.पूस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करणारे किसनराव शिंदे , किशोर भंडारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक डॉ विनय चव्हाण यांनी केले तर आभार
गटशिक्षणाधिकारी पांडरंग खांडरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमख , शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील पदाधिकारी तसेच समस्त नागापूर वासीयांनी परिश्रम घेतले.

*फोटो*

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!