पो स्टे उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास घेतले ताब्यात.

youtube

पो स्टे उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास घेतले ताब्यात

उमरखेड
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई

यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशव बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हाव याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या दिनांक 13/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन
उमरखेड हददीत मौजे महागांव उरमखेड रोड लगत संजेरी हॉटेल समोर इसम नामे. ताईफखान जहागिर खान रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ हा त्यांच्याकडे अग्नीशस्त्र (गावठी बनावटी कट्टा) बाळगुन असून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाली होती प्राप्त माहीती नुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून संजेरी हॉटेल समोर, एक इसम हा संशयीतरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ताईफखान जहागिर खान वय 21 वर्ष रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल (कटटा) व जिवंत काडतुस मिळून आल्याने जप्त करुन ताब्यात घेतली सदर देशी बनावटीची पिस्टल (कटटा) कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता अमजद खान सरदार खान रा वसंतनगर पुसद ता पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले. वरुन नमुद ताईफखान जहाँगिर खान वय 21 वर्ष रा सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ याचे कब्जातुन एक देशी बनावटीची पिस्टल (कटटा) दोन जिवंत काडतूस असा 31,000/- रु चा माल जप्त करुन आरोपी विरुध्द पो स्टे उमरखेड येथे भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील कार्यवाही कामी पो. स्टे उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, तसेच उप विभागिय पोलीस अधिकारी, उमरखेड श्री. हनुमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्था. गु.शा.श्री. आधारसिंग सोनोने, सपोनि गजानन गजभारे, पोउपनिरी अमोल राठोड, चापोउपनिरी रेवन जागृत पोहवा तेजाव रणखांव, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “पो स्टे उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास घेतले ताब्यात.

  1. I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!