उमरखेड शहर कडकडीत बंद पहेलगान हलल्याचा सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून निषेध उमरखेड:

youtube

उमरखेड शहर कडकडीत बंद 
पहेलगान हलल्याचा सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून निषेध

उमरखेड:
पहेलगाम येथे पाकिस्थानी दहशतवाद्यांकडून निष्पाप पर्यटकांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ विविध राजकिय पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या बंदला उमरखेड शहरातील सर्व व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शंभर टक्के बंद पाळण्यात आला. संजय गांधी चौक येथे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामाजिक संघटनेचे व शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांनी एकत्र येत निषेध सभेचे आयोजन केले. या निषेध सभेत सर्वांनी निषेध व्यक्त केल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या घटनेच्या निषेध नोंदविण्यासाठी भारत सरकारला तात्काळ पाकिस्तान विरोधी कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
या निषेध मोर्चात शहरातील सर्व राजकीय पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्वसामाजिक संघटना, गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, शहरातील सर्व उत्सव समित्या ,शहरातील सर्व पत्रकार संघटना व इतरही वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सदर बंद मध्ये सहभागी होत पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदविला.

चौकट

पाकिस्तानची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत पुतळ्याचे केले दहन !
उमरखेड शहरातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाग चौक ते संजय गांधी चौक इथपर्यंत पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत संजय गांधी चौकात पुतळ्याचे. दहन करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!