पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन गो. सी. गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्राचा उपक्रम उमरखेड
पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन
गो. सी. गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्राचा उपक्रम
उमरखेड
:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेल्या गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्र 1451 ए च्या वतीने दि. 29 एप्रिल मंगळवार रोजी पत्रकार सन्मान सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेला आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गावंडे महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी बी. ए. जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून विशेषांक प्रकाशित करण्यात येत असतो. अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांना आपल्या लेखणीतून विषय निवडीचे स्वातंत्र्य देऊन बातमी लिखाणासाठी प्रेरित करण्यात येत असते आणि सामूहिक लिखाणातून आलेल्या लेखाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी 29 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता म्युझियम सभागृह येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच उमरखेड शहरातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांचा देखील सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाकरिता प्रा. डॉ. सुभाष सोनूने – विभागीय संचालक , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अमरावती विभाग, सखाराम मुळे – उपविभागीय अधिकारी उमरखेड, प्रा. डॉ. दयाराम पवार – संचालक विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्र तथा सहयोगी प्राध्यापक , शिक्षण शास्त्र विद्या शाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शंकर पांचाळ – पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड, राम देवसरकर – अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था तथा माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती आणि डॉ. या. मा. राऊत – सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमाकरिता नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. एम. बी. कदम यांच्यासह बी. ए. जनसज्ञापन व वृत्तपत्र पदवी विद्या शिक्षणक्रमास असलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी केले आहे.



