उमरखेड येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन उमरखेड –

उमरखेड येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन
उमरखेड –
अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळ्याचे आयोजन उमरखेड येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोज बुधवार सकाळी 9 : 00 वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा उमरखेड शहरातील शिव कमल मंगल कार्यालय, फार्मसी कॉलेज जवळ, तिवडी रोड उमरखेड, तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ पश्चिम येथे करण्यात आले आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक पोलाजी कानोडे साहेब,जिल्हाध्यक्ष गजानन गरवारे, उमरखेड तालुकाध्यक्ष मनोज कुरतडे यांनी दिली.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती 24 तास विनामूल्य 53 रुग्णवाहिका अपघात ग्रस्त रुग्णांच्या सेवेत अविरतपणे चालू आहे. मरणोत्तर देहदान या उपक्रमांतर्गत जगद्गुरुश्रींनी संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत 77 मरणोत्तर देहदान संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत.
पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने शहरातून जगद्गुरुश्रीच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे सभा मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत .त्यामध्ये गुरुपूजन, उपासक दीक्षा ,आरती सोहळा , जगद्गुरुश्रींचे पादुका आगमन,अमृततुल्य असे प्रवचन , दर्शन सोहळा ,पुष्पवृष्टी तसेच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील गरजवंतांना 12 शिलाई मशीनचे मोफत वाटप आदी भरगच्च कार्यक्रम दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत. यावेळी उपासक दिक्षाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त भक्तगण यांची बुकिंग करून घ्यावी. उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिष्य, साधक, उपासक,भक्तगण , हितचिंतक,कार्यकर्ते यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ प्रमुख,पीठ सहप्रमुख,पिठ व्यवस्थापक ,जिल्हा निरीक्षक, पीठ समिती सदस्य ,जिल्हाध्यक्ष,हिंदू संग्राम सेना, महीला सेना, युवा सेना,ज.न.म.प्रवचनकार,गुरुसेवक, सर्व आजी व माजी पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष,जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती,आरती केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task
Mat6tube I’m fairly new to blogging, but I truly appreciate your content. This article really stood out to me. I’ll save your site and continue to check for fresh posts.
Experience the future of business networking in Iraq through Businessiraq.com, where digital innovation meets market opportunity. This pioneering platform offers an expansive Iraq business directory that serves as a vital resource for companies seeking to establish or expand their presence in the region. Stay informed with real-time business news in Iraq, covering everything from economic trends to regulatory updates. The platform’s comprehensive Iraq jobs section connects employers with talented professionals, while its tender directory provides invaluable access to procurement opportunities. With its extensive online business listings and user-friendly interface, Businessiraq.com stands as the definitive resource for building successful business relationships in Iraq’s growing economy.
Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate