शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ढाणकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न आर्य वैश्य भवन सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहान-एस पि .डॉ दिलिप पाटील भुजबळ

शिवजयंतीच्या पार्श्वभुमिवर ढाणकी येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न. आर्य वैश्य भवन
सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन.
उमरखेड, प्रतिनिधी
शिवजयंतीच्या पार्श्वभुमिवर बिटरगाव पोलीसांच्या वतीने ढाणकी येथील आर्य वैश्य भवन येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली असून जयंती महोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उद्या दि. १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आज दि. १८ रोजी उमरखेड तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या ढाणकी येथे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी, मुख्याधिकारी इंगोले, नायब तहसिलदार डांगे होते. शांतता कमेटीच्या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह सामाजिक सलोखा जपण्याचे जनतेला आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. तर सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या निरर्थक व खोट्या गोष्टींकडे लक्ष न देता तसेच बॅनरबाजीवरून समाजात तेढ निर्माण करणा-या आक्षेपार्ह पोस्टकडेही लक्ष न देता समाजात सलोखा व बंधुभाव कायम टिकवून ठेवण्याचे आवाहन एस.पि पाटील डॉ. भुजबळ पाटील यांनी सांगितले.आपल्या भाषणातून बिटरगावचे सरपंच प्रकाश पेधे यांनी बंदी भागातील समस्या व सोशल मिडिया वरील पोस्ट बदल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविख बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तर सुत्रसंचालन त्रिमकदार यांनी केले. बिटरगाव ,दराटी.चे ठाणेदार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शांतता बेठकिचे नियोजन केले . यावेळी परिसरातील सर्व गावचे पोलीस पाटील बांधवांसह तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळीची पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थिती होती..
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/ar/register?ref=V2H9AFPY