पोलिस हवालदार दिनेश चव्हाण पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानित

youtube

पोलिस हवालदार दिनेश चव्हाण पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानित

उमरखेड -:
आदर्श गाव जनूना येथील तरुण दिनेश चव्हाण या पोलीस दलातील तरुणाचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ,पवन बन्सोड यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे,
उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यास असलेले चव्हाण यांनी उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मोहिमेत घेण्याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उमरखेड स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिनेश चव्हाण यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथील सप्ताह मुद्देमाल भाग पाच व दारूबंदी याची जास्तीत जास्त विल्हेवाट लावून 141 मुद्देमालाचा निर्गती केल्याबद्दल दरमहा होणाऱ्या क्राईम मीटिंगमध्ये पोलीस स्टेशन उमरखेड ला पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळावुन देण्यात सिहाचा वाट असल्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची दखल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी घेऊन त्यांचा गौरव केला आहे,
जनुना सारख्या खेड्यातील तरुणाचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव झाल्यामुळे जनुना गावची मान अभिमानाने उंचावली असून दिनेश चव्हाण याचं सर्व गावकऱ्यां कडून कौतुक होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!