चुरमुरा – दगडथर दरीतील खुन प्रकरण ! सुमीतच्या खुनात आईचाही सहभाग असल्याचे निष्पन्न ! : पोलिसांनी केले आईला अटक : आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी :

youtube

चुरमुरा – दगडथर दरीतील खुन प्रकरण !

सुमीतच्या खुनात आईचाही सहभाग असल्याचे निष्पन्न !

: पोलिसांनी केले आईला अटक : आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी :

 

प्रतिनिधी
उमरखेड :

येथून ५ किलोमिटर अंतरावरील चुरमुरा गावाजवळील दगडथर रस्त्यावरील जंगलातील दरित सुमीत सोळंके या २३ वर्षीय तरुणाचा मृत्युदेह दिनांक १३ ऑक्टोंबर दुपारी १२ वाजता छन्नविछन्न अवस्थेत आढळुन आल्याने खळबळ उडाली होती .दरम्यान या खुनाच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते मात्र अवद्या १२ तासातच मारेकरी आरोपी आईच्या मामेभाऊच्या मुसक्या पोलिसांनी आवळुन जेरबंद केले होते . मात्र सुमीतच्या खुनाचा कट रचण्यात आईचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी काल दिनांक २२ रोजी तिला अटक केली असून न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे .

सुमीत प्रभाकर सोळंके (२३ ) याचा मृत्युदेह चुरमुरा गावापासून तिन कि . मी . अंतरावर दगडथर रस्त्यावरील एका दरीत त्याचा मृत्युदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळुन आला होता . सुमीतचा मारेकरी हा त्याच्या आईचा मामेभाऊ संदीप अवधुत जगताप (४१ ) याला पोलिसांनी अवघ्या बारा तासातच अटक केली होती . या खुन प्रकरणी त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती . दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यावेळी त्याने सुमीत सोळंके हा त्याची आई अरुणा सोळंके हिला सतत पैशाची मागणी करित होता. तो मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला होता त्यामुळे त्याच्या सततच्या ‘ त्याची आई कंटाळली होती. आणि आरोपी कडील पैशासाठीही त्याला तगादा लावत असल्याने सुमीतच्या खुनाचा कट रचल्याची कबूली आरोपीने पोलिस चौकशीत दिली होती . त्यानंतर आरोपी संदीप जगताप ने माहिती दिल्यावरून पोलिसांनी तपास चक्र सुमीतच्या आईच्या दिशेने सुरु केले . त्यात पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे मृतक सुमीत सोळंकेच्या आईच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता
आई अरुणा सोळंके हिच्या मोबाईल वरून आरोपी संदीप जगताप याला १२ वेळा कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले यावरून पोलिसांनी चौकशीसाठी अरुणा सोळंके हिला काल २२ ऑक्टोंबर रोजी ताब्यात घेतले तेव्हा तिने पोलिसांना सुमीतने त्याच्या वडिलाचे अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे विमा पॉलीसीचे लाखों रुपये मिळाले होते ते पैसे त्याने पुर्णपणे व्यसनाच्या आहारी जावुन उधळले होते . त्यानंतरही तो घरातील वस्तु विकणे, अन्नधान्य विकत होता त्यामुळे त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही संगनमताने खुन केल्याची कबुली पोलिसांना दिली . यावरून पोलिसांनी अरुणा प्रभाकर सोळंके ( ४५ ) हिला अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे . खुनाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पो. अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ, सपोनि . निलेश सरदार, गजानन गिते यांनी कामगीरी केली .

Google Ad
Google Ad

12 thoughts on “चुरमुरा – दगडथर दरीतील खुन प्रकरण ! सुमीतच्या खुनात आईचाही सहभाग असल्याचे निष्पन्न ! : पोलिसांनी केले आईला अटक : आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी :

  1. hello!,I like your writing very so much! proportion we communicate more about your post on AOL? I need a specialist on this house to resolve my problem. May be that’s you! Having a look forward to look you.

  2. What i don’t understood is actually how you are not actually much more well-liked than you might be now. You are so intelligent. You realize thus significantly relating to this subject, made me personally consider it from so many varied angles. Its like men and women aren’t fascinated unless it is one thing to accomplish with Lady gaga! Your own stuffs nice. Always maintain it up!

  3. Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea

  4. Smartcric naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  5. Nice post. I was checking constantly this blog and I am impressed! Extremely helpful information particularly the last part 🙂 I care for such information a lot. I was looking for this particular info for a very long time. Thank you and best of luck.

  6. whoah this blog is great i love reading your articles. Keep up the good work! You know, lots of people are searching around for this information, you can aid them greatly.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!