महाविकास आघागाडीचे साहेबराव कांबळे सोमवरला उमेदवारी नामांकन दाखल करणार
महाविकास आघागाडीचे साहेबराव कांबळे सोमवरला उमेदवारी नामांकन दाखल करणार
उमरखेड
-उमरखेड महागाव विधानसभा मतदार सघातील महाविकास आघाडीचे काग्रेस चे उमेदवार साहेबराव कांबळे हे सोमवारला आपले नामाकन अर्जदाखल करण्यात येनार असून तालुक्यातून दहा हजार कार्यकर्ते रवाना होणार आहे
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दि 28 ऑक्टोंबर 2024 रोजी राजस्थानी भवन, महागाव रोड, उमरखेड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
सभेनंतर राजस्थानी भवन येथून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कांबळे यांच्या समर्थनात सकाळी १० वाजता भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीसाठी उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व मतदार व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे हात बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे साहेबराव कांबळे याच्या साठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रवाना होणार आहे



