सौमित्रेसारखी सकारात्मकता अंगीकारा” – राधाकृष्ण महाराजांचा जीवनमंत्र पिंपळगाव येथील श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना प्रेरणादायी उपदेश पिपळगाव –
“सौमित्रेसारखी सकारात्मकता अंगीकारा” – राधाकृष्ण महाराजांचा जीवनमंत्र
- पिंपळगाव येथील श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना प्रेरणादायी उपदेश
पिपळगाव –
श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे सुरू असलेल्या श्रीराम कथेचा दुसरा दिवस भक्ती, भावनिकता आणि जीवनमूल्यांनी ओतप्रोत भरलेला ठरला. कथा व्यास राधाकृष्ण जी महाराज (जोधपूर) यांनी आपल्या सुमधुर वाणीने रामकथेचे रसाळ कथन करत उपस्थित भाविकांच्या अंत:करणाला स्पर्श केला.
“स्त्रियांनी सौमित्रेसारखी सकारात्मकता अंगीकारून परिवारात आनंद, समाधान आणि प्रेम निर्माण करावे,” असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. जीवनात सकारात्मक विचार ठेवले, तर संसारच स्वर्गसमान होतो, असे ते म्हणाले.
रामायणातील एक भावस्पर्शी प्रसंग उलगडताना त्यांनी दशरथ महाराजांच्या तीन राण्यांचा उल्लेख केला. पुत्रकामेष्टी यज्ञानंतर मिळालेल्या खिरीचे दोनच भाग झाल्यावर कौशल्या व कैकयी यांना प्रसाद मिळाला, मात्र सौमित्रा (सुमित्रा) यांना काहीच मिळाले नाही. तरीही त्यांनी अत्यंत उदात्त भावनेने “त्या दोघींना होणारे पुत्र माझेच आहेत,” असे मान्य केले. या निस्वार्थ भावनेने प्रभावित होऊन दोन्ही राण्यांनी आपल्या वाट्याचा अर्धा प्रसाद सुमित्रेला दिला आणि त्यातून लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
या प्रसंगातून त्या काळातील संस्कार, परस्परांतील विश्वास आणि नात्यांतील प्रेम अधोरेखित होते. “आजच्या समाजाला हाच विचार आणि हीच संस्कृती अत्यंत आवश्यक आहे,” असे सांगत महाराजांनी रामायण हे केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याचा मार्गदर्शक मंत्र असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी पिंपळगाव मठाचे मठाधीश, बालयोगी गोवत्स व्यंकट स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, व्यापारी, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने महिला, तरुण व भाविक उपस्थित होते.
या पवित्र रामकथेचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामीजींनी यावेळी केले.




Chơi slots nhận thưởng chỉ với 3 biểu tượng trở lên. 3D slots, video slots, megaway slots, jackpot lũy tiến,… tất cả các dòng game quay hũ kinh điển nhất hiện nay đều có tại 66b win . Chúng tôi mang đến cho hội viên hơn 1.000+ vòng quay miễn phí với mức RTP cực cao. TONY03-18O